---Advertisement---

11 चौकार आणि 5 षटकार, सरफराज खानची पुन्हा एकदा फटकेबाजी; ठोकले वादळी शतक

On: गुरूवार, जानेवारी 22, 2026 5:50 PM
---Advertisement---

22 जानेवारीपासून रणजी ट्रॉफी 2025-26 चे सामने खेळवले जात आहेत. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई आणि हैदराबाद यांच्यात हा सामना होत आहे. मुंबईकडून फलंदाजी करताना सरफराज खानने या सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने धडाकेबाज शतकी खेळी करत हैदराबादविरुद्ध आपला दबदबा निर्माण केला. सरफराज सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.

सरफराज खान 164 चेंडूत 142 धावांची खेळी करून अद्याप क्रीजवर टिकून आहे. त्याने आतापर्यंत आपल्या खेळीत 11 चौकार आणि 5 षटकार ठोकले आहेत. 28 वर्षीय सरफराजने आतापर्यंत उत्कृष्ट खेळ केला आहे. याआधी त्याने ‘अ’ दर्जाच्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही शानदार कामगिरी केली होती. त्या स्पर्धेत सरफराजने गोवा संघाविरुद्ध 157 धावांची खेळी केली होती. याशिवाय उत्तराखंडविरुद्ध त्याने 55 धावा केल्या होत्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने राजस्थानविरुद्ध 73 आणि हरियाणाविरुद्ध 64 धावांची खेळी साकारली होती.

सरफराज खानने भारतासाठी आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांमध्ये 37.10 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत. त्याने 1 शतकाव्यतिरिक्त 3 अर्धशतकेही झळकावली आहेत.

भारतासाठी त्याने आपला शेवटचा सामना 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर या स्टार खेळाडूकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. असे असूनही तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये (डोमेस्टिक क्रिकेट) सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे.
हैदराबादविरुद्ध प्रथम

फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर ए. हेरवाडकर याने 71 चेंडूत 27 आणि आकाश आनंदने 77 चेंडूत 35 धावा केल्या. याशिवाय मुशीर खानने 29 चेंडूत 11 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 87 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 332 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---