भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनी याची गणना सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये होते. त्याने भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. असे असले तरी एक काळ होता, जेव्हा इंग्लंडने भारतीय संघाला ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पूर्ण ‘व्हाईट वॉश’ देऊन नेस्तनाबूत केले होते. बरोबर १० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २२ ऑगस्ट २०११ साली इंग्लंडने ओवलच्या मैदानावर भारतीय संघाला पराभूत केले होते आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने भारताला ४-० अशा फरकाने नमवत ‘पतौडी चषका’वर आपले नाव कोरले होते. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता.
ओवलच्या मैदानावर १८ ऑगस्ट २०११ साली सुरू झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार अँड्रु स्ट्रॉसने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर इंग्लंड संघाने ६ विकेटच्या बदल्यात तब्बल ५९१ धावा ठोकल्या होत्या.
यामध्ये इयान बेलने २३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने तब्बल २३५ धावा केल्या होत्या. तर केविन पीटरसनने देखील त्याला साथ देत २७ चौकारांसह १७५ धावा केल्या होत्या. बेल आणि पीटरसन यांनी तिसर्या विकेटसाठी तब्बल ३५० धावांची भागीदारी केली होती. ज्यामध्ये भारतीय गोलंदाज एस श्रीसंतने ३ विकेट्स घेतल्या. तर, सुरेश रैनाला २ विकेट मिळाल्या होत्या.
राहुल द्रविडने सलामीला येऊनही शेवटपर्यंत दिली होती झुंज
यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून केवळ राहुल द्रविडने शतकीय खेळी केली. ज्यामध्ये द्रविडने नाबाद १४६ धावा केल्या होत्या. मात्र, द्रविडला इतर कोणताही भारतीय फलंदाज साथ देऊ शकला नाही. द्रविड आणि अमित मिश्रा यांनी मिळून ७ व्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. जी त्या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाची सर्वोच्च भागीदारी होती. ज्यामध्ये मिश्राने ७७ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या होत्या.
इंग्लंडकडून गोलंदाजी करताना टीम ब्रेसनन आणि ग्रॅम स्वान यांना प्रत्येकी ३ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात केवळ ३०० धावा बनवू शकला, आणि यामुळे भारतीय संघाला फॉलोऑन मिळाले.
या सामन्यातील दुसऱ्या डावात देखील भारतीय संघाच्या फलंदाजांनी असमाधानकारक फलंदाजी केली, आणि केवळ २८३ धावाच बनवल्या. यामध्ये सर्वाधिक ९१ धावा सचिन तेंडुलकरने केल्या होत्या. तर अमित मिश्राने देखील ८४ धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात कमाल केलेला द्रविड मात्र दुसर्या डावात केवळ १३ धावांवरच बाद झाला.
तर दुसऱ्या डावात इंग्लिश गोलंदाजांनी कमाल केली. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज ग्रॅम स्वानला ६ विकेट्स मिळाल्या. यामुळे भारतीय संघाने हा सामना ८ धावांनी गमावला होता. त्या दौऱ्यात भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. तसेच त्यावेळी इंग्लंडने ७ वर्षांत प्रथमच भारतीय संघाला मालिकेत एकही सामना जिंकू दिला न्हवता.
महत्वाच्या बातम्या –
–विराटच्या मोठ्या बहिणीने त्याचा व्यवसाय नेला उंचावर, मात्र प्रसिद्धीपासून राहते दूर; जाणून घ्या भावना कोहलीबद्दल
–अष्टपैलू हार्दिक पंड्याला टी२० विश्वचषकात मिळणार का संधी? गोलंदाजी प्रशिक्षकाने दिले उत्तर
–‘माझ्या जागी अशा खेळाडूला खेळताना पाहूच शकत नव्हतो, ज्याला मी क्लब संघातही जागा दिली नसती’