आजच्याच दिवशी ११ वर्षांपूर्वी २० जून रोजी विराट कोहली (Virat Kohli) याने कसोटी क्रिकेटमध्ये आपला पहिला सामना खेळला होता. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज विराटने किंगस्टन, जमैका इथे वेस्टइंडीजच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आज या निमित्ताने ११ वर्षांनी, त्याने आपला लॅपटॉप अनलॉक करत एक कमालीचे खास फोल्डर सगळ्यांसाठी खुले केले. यात अनेक अनमोल आठवणी आहेत. त्याने अतिशय यशस्वीपणे कर्णधारपद भूषवले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये ११ वर्ष पूर्ण केल्यानंतर, विराटने सोमवारी (२० जून) स्वदेशी सोशल मीडिया कू ऍप आणि इतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात त्याने कसोटी क्रिकेटमधील आपले अनेक सुरेख क्षण खुले केले आहेत.
https://www.kooapp.com/koo/virat.kohli/bd1df754-5ce4-4b41-821e-b3945c379584
३३ वर्षीय विराटने आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत १०१ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४९.९५ च्या सरासरीने ८०४३ धावा काढल्या आहेत. यात त्याचा सर्वोच्च स्कोर नाबाद २५४ धावा हा राहिला आहे. विराट सध्या वाईट फॉर्मच्या काळातून जातो आहे. त्याने शेवटच्या वेळी बांगलादेशविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये डे-नाइट कसोटी सामन्यामध्ये शतक बनवले होते.
Time flies ????????#20June #TestDebut pic.twitter.com/eIktcGLg6i
— Virat Kohli (@imVkohli) June 20, 2022
विराटने यावर्षी जानेवारीत दक्षिण आफ्रिकेत १-२ ने कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचे कसोटी कर्णधारपद सोडले होते. तो ६८ सामन्यांमध्ये ४० विजय नावावर असलेला भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. तो ग्रॅमी स्मिथ, एलन बॉर्डर, स्टीफन फ्लेमिंग, रिकी पाँटिंग आणि क्लाइव्ह लॉयड यांच्या नंतर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला सहावा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कार्तिकच्या दीर्घ कारकीर्दीत धोनीचं करिअर संपलं’, भारताच्या माजी दिग्गजाची खळबळजनक प्रतिक्रिया
दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर टी-२० विश्वचषकासाठी भक्कम बनला भारतीय संघ, वाचा सविस्तर
दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर टी-२० विश्वचषकासाठी भक्कम बनला भारतीय संघ, वाचा सविस्तर






