---Advertisement---

२ मराठमोळ्या खेळाडूंसह भारतीय कबड्डी संघाच्या निवड शिबिरासाठी रेल्वेच्या १२ खेळाडुंची निवड

On: शुक्रवार, नोव्हेंबर 1, 2019 8:15 AM
---Advertisement---

नेपाळ येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी (Kabaddi) पुरुष व महिला संघ पाठवण्यात येणार आहे. यास्पर्धेसाठी भारतीय (Indian) संघाच्या निवड शिबिरासाठी भारतीय रेल्वे (Indian Railway) संघातील ६ पुरुष व ६ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

६६ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रेल्वेच्या दोन्ही संघानी विजेतेपद पटाकवले आहे. रोहटक, हरियाना येथे ५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ दरम्यान हे निवड शिबिर होणार आहे. त्यातून भारतीय पुरुष व महिला संघ निवडला जाईल.

सदर शिबिरासाठी रेल्वे संघातील परवेश, पवन कुमार,रवींद्र पहल, श्रीकांत जाधव, सुनील कुमार व विकास कंडोला या सहा जणांची पुरुष संघ निवड शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.

तर रेल्वे महिला संघातील मोटी चंदन, पायल चौधरी, पिंकी रॉय, पूजा, रितू नेगी व सोनाली शिंगटे (Sonali Shingte) यांची महिला संघ निवड शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.

यात मराठमोळ्या श्रीकांत जाधव (Shrikant Jadhav) व सोनाली शिंगटे यांचा समावेश आहे.

नेपाळ येथे १ डिसेंबर ते १० डिसेंबर २०१९ दरम्यान दक्षिण आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेसाठी भारतीय संघ २८ नोव्हेंबर २०१९ रोजी दिल्ली येथून रवाना होईल.

याची माहिती भारतीय हौशी कबड्डी महासंघाकडून रेल्वे स्पोर्ट्स प्रोमोशन बोर्ड यांना पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---