‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडूलकर याचे क्रिकेटबद्दलचे प्रेम जगापासून लपून राहिलेले नाही. कारकिर्दीतील जवळपास २४ वर्षे क्रिकेटला दिल्यानंतरही क्रिकेटबद्दलची त्याच्या मनातली ओढ थोडीही कमी झाली नाही. अगदी सचिनप्रमाणे त्याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर यालाही क्रिकेटचे वेड आहे. आयपीएलच्या आगामी चौदाव्या हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे.
कौतुकास्पद बाब अशी की, अर्जुनला विद्यालयीन वयात असतानापासून मुंबई संघाचा भाग होण्याची इच्छा होती. त्याने वयाच्या १२ व्या वर्षी मुंबई संघाची जर्सी परिधान करुन फलंदाजीचा सराव केला होता. नुकताच सोशल मीडियावर त्याचा हा जुना व्हिडिओ चर्चेत आला आहे.
या व्हिडिओत अष्टपैलू अर्जुन मुंबई संघाची जर्सी अंगावर चढवून एका गोलंदाजी मशीनसमोर फलंदाजी करताना दिसत आहे. वानखेडे स्टेडियमवर एक क्रिकेट सामना झाल्यानंतर त्याने फलंदाजीत हाथ आजमावला होता. दरम्यान तो चेंडू हवेत टोलवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
https://youtu.be/P6qCpm3CRdk
वानखेडे स्टेडियममधील फोटो झाला होता व्हायरल
एवढेच नव्हे तर, काही दिवसांपुर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विश्वचषक २०११ मधील सामना पाहतानाचा त्याचा फोटो चांगलाच चर्चेत आला होता. या फोटोतही त्याने मुंबई संघाची जर्सी घातली होती आणि त्याच्या बाजूला भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ बसला होता.
मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पणासाठी सज्ज
२१ वर्षीय अर्जुनला यंदा रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सने २० लाखांच्या मुळ किंमतीला विकत घेतले आहे. तो आयपीएल पदार्पणासाठी सराव सत्रात घाम गाळताना दिसत आहे. याआधी आयपीएल २०२० मध्ये तो मुंबई संघासोबत नेट बॉलर म्हणून युएईला गेला होता. याबरोबरच त्याला स्थानिक आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये गोलंदाजी आणि गरजेनुसार फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याला यंदा मुंबईकडून आयपीएल पदार्पणाची संधी मिळू शकते.
मुंबई इंडियन्सचा या हंगामातील पहिला सामना ९ एप्रिल रोजी, चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतातील सर्वात सुंदर स्टेडियमवर होणार आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकाचा पहिला सामना
दिलदार धोनी, मोठ्या मनाचा रोहित; ‘ही’ गोष्ट घडताच संजू सॅमसनला मेसेज करुन म्हणाले…
पुन्हा एकदा आयपीएल दरम्यान रंगणार महिला टी२० चॅलेंजचा थरार, ‘या’ दिवशी होणार शुभारंभ