इंग्लंडचा संघ सध्या भारत दौर्यावर असून उभय संघ पाच सामन्यांची टी२० मालिका खेळत आहेत. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी अहमदाबादच्या नूतन ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ वर खेळवला गेला. या सामन्यात खेळाडूंचे काही पराक्रम नोंदवले गेलेच, मात्र प्रेक्षक क्षमतेचाही एक भलामोठा विक्रम या दिवशी नोंदवला गेला. या सामन्यात नोंदवली गेलेली प्रेक्षक संख्या कोरोना विषाणूनंतर खेळवल्या गेलेल्या कुठल्याही सामन्यातील सर्वोच्च प्रेक्षक संख्या आहे.
जगातील सर्वात मोठे स्टेडियम
अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमचे नूतनीकरण ते आता कार्यरत झाले आहे. नूतनीकरणानंतर या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता तब्बल १ लाख ३२ हजार इतकी अवाढव्य झाली. त्यामुळे प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने हे स्टेडियम आता जगातील सर्वात मोठे स्टेडियम झाले आहे.
विक्रमी प्रेक्षक संख्या
कोरोना विषाणूपश्चात सामने सुरू झाले असले तरी पण धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना बहुधा प्रवेश नाकारला जातो अथवा निम्म्याच क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश दिला जातो. याच नियमानुसार शुक्रवारच्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात ५०% प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती.
मात्र तरीही या सामन्यातील प्रेक्षक संख्या ही कोरोना विषाणूनंतर खेळवल्या गेलेल्या कुठल्याही सामन्यातील सर्वोच्च प्रेक्षक संख्या ठरली. हा सामना पाहण्यासाठी त्या दिवशी तब्बल ६७,२०० चाहते स्टेडियममध्ये हजर होते. गुजरात क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार ५०% तिकिटचं विक्रीसाठी ठेवले होते. मात्र ते सगळे तिकीट खरेदी केलेले प्रेक्षक आवर्जून या सामन्यासाठी उपस्थित होते.
भारताचा पहिल्या सामन्यात पराभव
ही विक्रमी प्रेक्षक संख्या नोंदवली गेली असली तरी भारतीय चाहत्यांसाठी हा सामना निराशाजनक ठरला. भारतीय संघाला या सामन्यात इंग्लंडकडून ८ गड्यांनी पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना आज, म्हणजेच १४ मार्चला याच स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
किती ते दुर्दैव! विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी-पड्डीकलने खोऱ्याने काढल्या धावा, तरीही वनडेत संधी नाही
Blog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग
आयपीएलची चुरस वाढणार, आगामी हंगामात होणार नवीन संघांचा समावेश