---Advertisement---

लिलावात करोडपती झालेल्या 13 वर्षीय खेळाडूवर वयाच्या फसवणुकीचा आरोप

On: मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024 12:13 PM
Vaibhav-Suryavanshi-Ranji-Debut
---Advertisement---

13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी आयपीएल 2025 मेगा लिलावात येण्यापूर्वीच चर्चेत होता. राजस्थान रॉयल्सनं लिलावात त्याच्यावर 1.10 कोटी रुपयांची बोली लावल्यानं क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आता त्यांच्या हाताखाली वैभवला खूप काही शिकायला मिळेल.

दरम्यान, वैभव एका चुकीच्या कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. लिलावात करोडपती होताच त्याच्यावर वयाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. इंटरनेटवर अनेकांनी वैभवच्या वयावर आक्षेप नोंदवला. वैभव सूर्यवंशी याचं खरं वय 15 वर्ष असल्याचं अनेकांचं मत आहे. आता वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी वयाच्या फसवणुकीच्या कमेंटवर टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंय.

‘पीटीआय’च्या वृत्तानुसार संजीव सूर्यवंशी म्हणाले, “वैभव जेव्हा साडेआठ वर्षांचा होता, तेव्हा तो बीसीसीआयच्या हाडांच्या चाचणीला सामोरा गेला होता. त्यानं याआधीच भारताच्या अंडर 19 संघासाठी पदार्पण केलं आहे. आम्हाला कुठलीही भीती नाही. गरज पडल्यास वैभव पुन्हा टेस्ट करायला तयार आहे.” वैभवच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाला फक्त क्रिकेट खेळायचं आहे आणि वादांपासून दूर राहायचं आहे. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, बीसीसीआय खेळाडूंचं खरं वय तपासण्यासाठी हाडांची चाचणी घेते.

वैभव सूर्यवंशी बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहारकडून खेळतो. यावर्षी मुंबई विरुद्धच्या रणजी सामन्यातून त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच्या नावावर सध्या 5 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 100 धावा आहेत. याशिवाय त्यानं एक विकेटही घेतली आहे. त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये राजस्थान विरुद्धच्या सामन्यात टी20 पदार्पण केलं. मात्र पहिल्या सामन्यात त्याला केवळ 13 धावा करता आल्या.

हेही वाचा – 

कोच गंभीर ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतला! कारण जाणून घ्या
आयपीएलचं एक पर्व संपलं! वॉर्नरसह या 5 दिग्गजांना लिलावात खरेदीदार मिळाला नाही
अखेर अर्जुन तेंडुलकरवर बोली लागली! सुरुवातीला राहिला होता अनसोल्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---