भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याला भारतातच नाही, तर जगभरात मोठी लोकप्रियता मिळालेली आहे. त्याचे चाहते जगभरात दिसून येतात. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असली, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार असलेला धोनी सर्वांना केवळ आयपीएलमध्येच दिसून येत आहे, तरी त्याच्या लोकप्रियतेमध्ये खंड पडलेला दिसून आलेला नाही. याचाच प्रत्येय देणारी गोष्ट नुकतीच समोर आली आहे.
४० वर्षीय धोनी त्याच्या कामगिरीबरोबरच त्याच्या शांत स्वभावामुळे अनेकांचा आदर्श आहे. त्याला नुकतेच एका १६ वर्षीय चाहत्याने एक पत्र लिहिले आहे. ज्यावर धोनीने स्वत: स्वाक्षरी देखील केली आहे. चाहत्याने लिहिलेल्या पत्रात धोनीबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त होत आहे. या पत्राचा फोटो चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) शेअर केला आहे.
या पत्राच्या सुरुवातीला चाहत्याने लिहिले आहे की, ‘जेव्हा काळोख असेल, तेव्हा तू तो मिटवला आहे आणि जेव्हा लख्ख प्रकाश आधीच असेल तेव्हा तू त्याला अब्जावधींच्या समुद्रात आणखी उजळवला आहे. आम्ही सर्वजण वेगळे आहोत, पण आम्ही तुझे चाहते म्हणून काहीसे सारखेच आहोत, म्हणूनच तू आमच्या जीवनावर सारखाच प्रभाव पाडतो.’
पुढे १६वर्षीय मुलाने तो धोनीचा चाहता कसा झाला हे सांगितले आहे. त्याने सांगितले की, धोनी त्याच्या कारकिर्द आणि यशापेक्षाही व्यक्ती म्हणून चांगला आहे. याबरोबरच या चाहता असेही म्हणाला आहे की, जरी धोनी फार त्याच्या भावना दाखवत नसला, तरी तो जेव्हा परिस्थिती जशी असेल तशी त्यावेळी रडला आहे, हसला आणि सेलिब्रेशनही केले आहे.
इतकंच नाही, तर चाहत्याने शेवटी धोनीने त्याला आणि सर्वांनाच नम्र राहायला, प्रामाणिक राहायला आणि आयुष्यात योग्य जोखीम घेणे किती महत्त्वाचे आहे हे शिकवले असल्याचे म्हणले आहे. त्याचबरोबर चाहत्याने धोनीसारखा भविष्यात कोणी नसेल असेही म्हणले आहे.
या चाहत्याच्या पत्रावर धोनीनेही स्वाक्षरी केली असून उत्तर दिले की, ‘छान लिहिलं आहेस.’ तसेच त्याने चाहत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. (16-year-old fan’s letter to MS Dhoni)
Words from the 💛 framed for life &
signed with 7⃣ove!#SuperFans #WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/cpYgyTxBOI— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 17, 2022
धोनी सध्या चेन्नई सुपर किंग्स संघासह आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) व्यस्त आहे. यावर्षीचे आयपीएल चेन्नई सुपर किंग्ससाठी फारसे चांगले राहिलेले नाही. त्यांनी आत्तापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये खेळलेल्या १३ सामन्यांपैकी ४ सामन्यांत विजय मिळवला आहे आणि ९ सामन्यांत पराभव पत्करला आहे. त्यामुळे चेन्नईचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
महिला क्रिकेटविश्वात निर्विवाद सत्ता गाजवतायेत ऑस्ट्रेलियाच्या रणरागिणी
मुंबई विरुद्धच्या विजयासह हैद्राबादच्या प्लेऑफच्या आशा जिवंत, पण कसं आहे समीकरण? वाचा
दुखापतग्रस्त खेळाडूंचे मानधन ते अंपायर्सचा पगार, जाणून घ्या आयपीएलमधील काही रोचक फॅक्ट्स