---Advertisement---

तिलक वर्माचा भीमपराक्रम! टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू

On: शनिवार, नोव्हेंबर 23, 2024 11:58 AM
---Advertisement---

भारतातील प्रमुख देशांतर्गत टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला आजपासून (23 नोव्हेंबर) सुरुवात झाली. आज स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एक मोठा विक्रम झाला आहे. हैदराबादचा कर्णधार तिलक वर्मानं मेघालयविरुद्ध शतक झळकावलं. यासह तो टी20 फॉरमॅटमध्ये सलग तीन शतकं झळकावणारा इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजानं असा पराक्रम केला नव्हता!

डावखुरा फलंदाज तिलक वर्माचा अलीकडचा फॉर्म अतिशय उत्कृष्ट आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्यानं शतकं झळकावली होती. यानंतर त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही हा सिलसिला कायम ठेवला आणि जबरदस्त खेळी खेळत सलग तिसरं शतक ठोकलं. अशा प्रकारे तिलकनं टी20 फॉरमॅटमध्ये सलग तीन शतकं झळकावण्याचा विश्वविक्रम केला आहे.

तिलकनं मेघालयविरुद्ध 67 चेंडूत 151 धावांची खेळी खेळली, ज्यात 14 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश आहे. याआधी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात त्यानं 56 चेंडूत 107 धावांची नाबाद खेळी केली होती. तर चौथ्या सामन्यात तो 47 चेंडूत 120 धावा करून नाबाद राहिला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन टी20 सामन्यांमध्ये शतकं झळकावून तिलक वर्मानं भारतीय खेळाडूंच्या एका खास क्लबमध्ये स्थान मिळवलं होतं. या क्लबमध्ये त्याच्या व्यतिरिक्त फक्त संजू सॅमसनचा समावेश आहे, ज्यांनी टी20 आंतरराष्ट्रीय सलग दोन शतकं झळकावण्याचा पराक्रम केला. संजूनं बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावलं होतं. तर तिलकनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात संजूची बरोबरी केली.

तिलक वर्माला आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सनं रिटेन केलं आहे. यामुळे तो मेगा लिलावाचा भाग असणार नाही. नाहीतर त्याच्यावर मोठी बोली नक्कीच लागली असती.

हेही वाचा – 

IND vs AUS: भारताने ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडला, 1981 नंतर टीम इंडियाने कांगारूंना दाखवले वाईट दिवस
लज्जास्पद..! विराट कोहली झेल सोडण्यात बाबर आझमच्याही पुढे
पर्थमध्ये बुमराहची जादू, सेना देशांमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच, कपिल देवचा महान विक्रम मोडीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---