भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या 150 धावांसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात केवळ 104 धावांत गारद झाला. यासह यजमानांच्या नावावर लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताविरुद्धच्या पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 1947 मध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया 107 धावांत ऑलआऊट झाला होता. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी शेवटच्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे संघाला 100 धावांचा टप्पा पार करता आला.
याशिवाय 2000 नंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताविरुद्ध 104 धावा करण्यापूर्वी कांगारू 2010 मध्ये इंग्लंडविरुद्ध 98 धावा आणि 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 85 धावा केल्या होत्या.
2000 नंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी धावसंख्या
85 विरुद्ध दक्षिण आफ्रिका होबार्ट 2016
98 विरुद्ध इंग्लंड मेलबर्न 2010
104 विरुद्ध भारत पर्थ 2024*
127 विरुद्ध पाकिस्तान सिडनी 2010
136 विरुद्ध न्यूझीलंड होबार्ट 2011
टीम इंडियाची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली असून त्यानंतर आघाडी मिळवण्यात भारताला यश आले आहे. यापूर्वी टीम इंडियाने 1936 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध 147 धावा करून 13 धावांची आघाडी घेतली होती. या यादीच्या शीर्षस्थानी 2002 मध्ये न्यूझीलंडविरुद्धचा हॅमिल्टन सामना आहे. जेव्हा भारताने 99 धावा केल्या होत्या आणि 5 धावांची आघाडी घेतली होती.
पहिल्या डावातील सर्वात कमी धावसंख्या ज्यासाठी भारताने आघाडी घेतली
99 विरुद्ध न्यूझीलंड हॅमिल्टन 2002 (पाच धावांची आघाडी)
147 विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स 1936 (13)
150 विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ 2024 (46)*
179 विरुद्ध इंग्लंड वानखेडे 1981 (13)
कर्णधार जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला 104 धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर हर्षित राणाला तीन आणि मोहम्मद सिराजला दोन यश मिळाले.
हेही वाचा-
लज्जास्पद..! विराट कोहली झेल सोडण्यात बाबर आझमच्याही पुढे
IND VS AUS; बुमराहचा पंजा, ऑस्ट्रेलिया 104 धावांवर सर्व बाद; भारताकडे 46 धावांची आघाडी
पर्थमध्ये बुमराहची जादू, सेना देशांमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच, कपिल देवचा महान विक्रम मोडीत





