---Advertisement---

17 वर्षीय खेळाडूचा भारतीय संघात समावेश, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करणार पदार्पण

Shabnam Shakil
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका महिलांचा भारत दौरा सुरु आहे. भारतीय महिला संघानं या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. परंतू आता भारतीय संघात मध्यमगती गोलंदाज शबनम शकीलचा (Shabnam Shakil) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या घरच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघात समावेश करण्यात आला आहे.

शबनम शकीलला नक्कीच आता भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची आतुरता लागली असेल. परंतु उर्वरित संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 17 वर्षीय शबनमचा सध्या बेंगळुरु येथे सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेसह तिन्ही फॉरमॅटसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. रविवारी होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर, चेन्नईमध्ये 1 कसोटी (28 जून ते 1 जुलै) दरम्यान खेळली जाणार आहे. तर त्यानंतर 3 टी20 (5, 7 आणि 9 जुलै) रोजी खेळल्या जाणार आहेत.

भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 एकदिवसीय सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची उपकर्णधार सलामीवीर स्मृती मानधनानं (Smriti Mandhana) शतक झळकावलं होतं तर दुसऱ्याही एकदिवसीय सामन्यात तिनं सलग दुसरे शतक झळकावलं आणि सलग 2 शतक झळकावणारी पहिला भारतीय महिला ठरली. कर्णधार हरमनप्रीत कौरनं देखील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झंझावाती शतक ठोकलं.

 

भारताचा एकदिवसीय मालिकेसाठी संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री, डिलन हेमलता, राधा यादव, आशा शोभना, श्रेयंका पाटील, सायका इशाक, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर, प्रिया रेड्डी, अरविंद यादव पुनिया, शबनम शकील

भारताचा कसोटी सामन्यासाठी संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, शुभा सतीश, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा छेत्री, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायका इशाक, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, प्रिया पुनिया, शबनम शकील

भारताचा टी20 मालिकेसाठी संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, डिलन हेमलता, उमा छेत्री, रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, राधा यादव, अमनजोत कौर, आशा शोभना, पो. रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी आणि शबनम शकील

महत्त्वाच्या बातमी-

सूर्यकुमार यादवचं शानदार अर्धशतक, भारताचं अफगाणिस्तानसमोर 182 धावांचं आव्हान
सुपर 8 सामन्यात भारतानं जिंकला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
हॉकी पुणे लीगला आजपासून होणार सुरुवात, कनिष्ठ व वरिष्ठ गटांमध्ये १८ संघांमध्ये चुरस

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---