आयपीएलच्या 17 व्या हंगाम हा कालपासून सुरु झाला आहे. तर पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने आरसीबीचा 6 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जचा संघ आमने-सामने आला आहे. तर या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर दिल्ली कॅपिटल्साठी डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शची सलामी जोडी मैदानात आली होती. तर मिचेल मार्शने वादळी खेळी करत संघाला चांगली सुरवात करून दिली होती. पण अर्शदीप सिंगने मार्शला तर दिल्ली कॅपिटल्सला दमदार सुरूवात करून देणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला हर्षल पटेलने 29 धावांवर बाद केले आहे. त्यानंतर अखेर 453 दिवसांनी परतलेल्या ऋषभ पंतला मैदानात परतला होता. पण ऋषभ पंत मात्र 13 चेंडूत केवळ 18 धावा करून तो देखील बाद झाला आहे.
दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने 4 षटकात 29 धावा खर्च करून सर्वाधिक विकेट्स नावावर केल्या. तर अर्शदीप सिंग, राहुल चहर आणि कागिसो रबाडाला प्रत्येकी 1 विकेट मिळाली आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 174 धावा केल्या आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्स कडून शाई होप याने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर कॅप्टन ऋषभ पंत याने 18 रन्सचं योगदान दिलं. मिचेल मार्श याने 20 धावा जोडल्या. तर इतर फलंदाज अपयशी ठरले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
- 454 दिवसांनंतर मैदानात परतल्यावर ऋषभ पंत भावूक! म्हणाला, लहान लहान…
- आयपीएलच्या पहिल्या सामन्यात जाडेजावर भडकला विराट कोहली? म्हणाला, “श्वास तर घेऊ दे…