---Advertisement---

19व्या एलबीएचएम अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत 360 खेळाडू सहभागी

On: गुरूवार, फेब्रुवारी 19, 2026 5:57 PM
Chess
---Advertisement---

पुणे, 19 फेब्रुवारी 2026: आर्यन्स बुद्धिबळ अकादमी यांच्या तर्फे 19व्या एलबीएचएम अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 360 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कूल, हांडेवाडी, पुणे येथे रविवार, 22 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे.

स्पर्धेचे आयोजन सचिव नागनाथ हलकुडे यांनी सांगितले कि, हि स्पर्धा एआयसीएफ, फिडे, एमसीए, पीडीसीसी यांच्या मान्यतेखाली होत असून स्पर्धेत एकूण 4लाख 11हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्वीस लीग फॉरमॅट प्रमाणे खेळण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण 9 फेऱ्यांमध्ये होणार आहेत. हि स्पर्धा खुल्या वयोगटात होणार आहे.

स्पर्धेत आतापर्यंत 360 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये आयएम सुयोग वाग(2291), आयएम अक्षय बोरगावकर(2278), आयएम कशिश जैन (2249), आयएम निखिल दिक्षित(2217), डब्ल्युसीएम अनुष्का कुतवळ(1855), एफएम अनिरुद्ध देशपांडे(2008)या अव्वल खेळाडूंचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---