पुणे, 22 फेब्रुवारी 2026: आर्यन्स बुद्धिबळ अकादमी यांच्या तर्फे आयोजित 19व्या एलबीएचएम अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरी अखेर सुयोग वाघ, अक्षय बोरगावकर, कशिश जैन, अविरत चौहान, संकर्षा शेळके, प्रियांशु पाटील यांनी 5 गुणांसह संयुक्तरीत्या आघाडी प्राप्त केली आहे.
ध्रुव ग्लोबल स्कूल, हांडेवाडी, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत आंतरराष्ट्रीय मास्टर सुयोग वाघने निहिरा कौलचा पराभव करून 5 गुण प्राप्त केले. तर, दुसऱ्या पटावर आंतरराष्ट्रीय मास्टर अक्षय बोरगावकरने अंजनेय फाटकचा, कशिश जैन याने मिहिर सरवदेचा पराभव करून 5 गुणांची कमाई केली.
स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू व छत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले, आंतरराष्ट्रीय मास्टर सुयोग वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य(पुरंदर) अमित झेंडे, आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दिक्षित, अंक्षय बोरगावकर, कशिश जैन, चीफ आरबीटर विनिता श्रोत्री, डेप्युटी चीफ आरबीटर जुईली कुलकर्णी, पेअरिंग आरबीटर दिप्ती शिदोरे, पीडीसीसीचे संयोजन सचिव राजेंद्र शिदोरे, स्पर्धा संयोजन सचिव नागनाथ हलकुडे आणि स्पर्धा संयोजन अध्यक्ष वंदना हलकुडे स्पर्धा संचालक योगेश महामुनी उपस्थित होते.
निकाल: पाचवी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
निहिरा कौल(4गुण) पराभुत वि. सुयोग वाघ(5गुण);
अक्षय बोरगावकर(5गुण) वि.वि.अंजनेय फाटक(4गुण);
मिहिर सरवदे(4गुण) पराभुत वि. कशिश जैन(5गुण);
श्लोक शरणार्थी(4.5गुण) बरोबरी वि. ललितादित्ययांवर भूमीनाथन(4.5गुण);
ओम रामगुडे(4गुण) पराभुत वि. अविरत चौहान(5गुण);
संकर्षा शेळके(5गुण) वि.वि.अनुष्का कुतवळ(4गुण);
क्षितिज प्रसाद(4गुण) पराभुत वि. प्रियांशू पाटील(5गुण);
कैवल्य वैद्य(4गुण) पराभुत वि. ओम लामकाने(4.5गुण);
मयूर गुप्ता(3.5गुण) पराभुत वि. निखिल दिक्षित(4.5गुण);
अनिरुद्ध देशपांडे(4गुण) बरोबरी वि. पार्थ मोघे(4गुण);
सौरभ म्हामणे(3.5गुण) पराभुत वि. अयान सोमाणी(4.5गुण);
शाश्वत गुप्ता(4.5गुण)वि.वि.श्रीराम म्हसणे(3.5गुण);
भुवन कोणुर(3.5गुण) पराभुत वि. आशिष चौधरी(4.5गुण);
सुयोग वडके(3.5गुण) पराभुत वि. हर्षल पाटील(4.5गुण);
गर्व देवनानी(3.5गुण) पराभुत वि. हर्ष घाडगे(4.5गुण).






