पुणे- महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना(एमसीए) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ एलो2000पेक्षा अधिक रेटिंग खेळाडूंसाठीच्या स्पर्धेत अग्रमानांकित फारुख अमोनातोव्ह आणि ग्रँडमास्टर अलेक्सिस अलेक्झांड्रोव्ह यांनी चमकदार कामगिरी करताना बुद्धिबळ स्पर्धेच्या दहाव्या फेरीअखेर संयुक्त आघाडीचे स्थान निश्चित केले.
श्रीशिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दहाव्या फेरीत अमोनातोव्ह आणि अलेक्झांड्रोव्ह या दोघांचे प्रत्येकी 8गुण आहेत. भारताच्या अर्जुन कल्याणने अमोनातोव्हला बरोबरीत रोखताना 7.5 गुणांसह दुसर्या स्थानावर झेप घेतली. तर बोरिस सॅव्हचेन्को, दीप सेनगुप्ता, लुका पैचाझ, मिहाईल निकिचेन्को, एलआर श्रीहरी, आदित्य मित्तल, नीलेश साहा, कुशाग्र मोहन, किरिल स्टुपॅक, अनुज शिवरात्री व अलेक्सी फेडेरोव्ह हे सर्व खेळाडू प्रत्येकी 7गुणांसह संयुक्त तिसर्या स्थानावर आहेत.
आज जालेल्या पहिल्या सहा पटांवरील पाच अव्वल खेळाडूंच्या लढती बरोबरीत सुटल्या. उद्या स्पर्धेची अखेरची 11वी फेरी खेळली जाणार आहे. फारूख अमोनातोव्ह आणि ग्रॅन्डमास्टर अलेक्सिस अलेक्झांड्रोव्ह यांच्यातील लढतीवर विजेता ठरणार आहे. ही लढत बरोबरीत सुटल्यास अर्जुन कल्याणला विजेतेपदाची संधी आहे. त्याला उद्या अळेरच्या सामन्यात फेडेरोव्हविरुदध खेळावे लागेल. त्याआधी भारताच्या राम अरविंदने महिला ग्रॅन्डमास्टर मेरी अॅन गोम्सला पराभूत करून आंतरराष्ट्रीय मास्टर पदाचा पहिला नॉर्म मिळविला. तसेच सातत्यपूर्ण खेळ करणार्या दीप सेनगुप्ताला अलेक्झांड्रोव्हकडून पराभवाचा धक्का बसला.
भक्ती कुलकर्णीने ग्रॅन्डमास्टर वेंकटेशला बरोबरीत रोखताना चमकदार कामगिरी केली. तर कोंगुवेलने ग्रॅन्डमास्टर मिर्झोेव्हला पराभूत करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
निकाल: दहावी फेरी: व्हाईट व ब्लॅक या नुसार:
जीएम अर्जुन कल्याण (भारत)(7.5गुण)बरोबरी वि.जीएम फारूख अमोनोतोव्ह(ताजिकिस्तान)(8गुण)
जीएम अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज (बेलारूस)(8गुण)वि.वि.जीएम दीप सेनगुप्ता (भारत)(7गुण);
जीएम पैचाझ लुका(जॅर्जिया)(7गुण)बरोबरी वि.जीएम स्तूपक किरील(बेलारूस) (7गुण);
जीएम सावचेन्को बोरिस (रशिया)(7गुण)बरोबरी वि.जीएम निकितेन्को मिहेल(बेलारूस)(7गुण);
आयएम श्रीहरी एल.आर(भारत)(7गुण)बरोबरी वि.आयएम आदित्य मित्तल (भारत)(7गुण);
जीएम ललित बाबू एम.आर(भारत)(6.5गुण)बरोबरी वि.आयएम नीलश शहा(भारत)(6.5गुण)
अमेय ऑडी(भारत)(6गुण)पराभूत वि.जीएम अलेक्सी फेडरोव्ह(7गुण);
जीएम वेंकटेश एमआर(भारत)(6.5गुण)बरोबरी वि.आयएम भक्ती कुलकर्णी(भारत)(6.5गुण);
आयएम अनुज श्रीवत्री(भारत)(7गुण)वि.वि.जीएम कार्तिक वेंकटरामन(भारत)(6गुण);
सीएम कुशाग्र मोहन(भारत)(7गुण)वि.वि.आयएम ओर्टिक निगमतोव्ह(5.5गुण)
एफएम आदित्य सामंत(भारत)(6.5गुण)बरोबरी वि.प्रसन्ना एस(भारत)(6.5गुण);
महत्वाच्या बातम्या –
मलिंगा-बुमराहलाही मागे टाकेल अशी गोलंदाजी ऍक्शन! बॉलरचा व्हिडिओ पाहून मायकल वॉनही चकित
अमित शहांनंतर ओडिसाचे मुख्यमंत्री पाहायला येणार मॅच, INdvsSA मधील दुसऱ्या टी२०ला लावणार हजेरी
वाईट झालं! खराब फॉर्मातून जात असलेल्या पृथ्वी शॉचं तुटलं हृदय, गर्लफ्रेंड प्राचीसोबत झालंय ब्रेकअप?