पुणे- महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना(एमसीए) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ एलो2000पेक्षा अधिक रेटिंग खेळाडूंसाठीच्या स्पर्धेत अग्रमानांकित फारूख अमोनातोव्हने जबरदस्त कामगिरी करताना विजेतेपदाचा मान मिळविला.
श्रीशिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताचा ग्रॅन्डमास्टर अर्जुन कल्याणने क्षणाक्षणाला रंगतदार ठरलेल्या अखेरच्या11व्या फेरीतील डावात चतुर्थ मानांकित अलेक्सी फेडेरोव्हला पराभूत करून अग्रमानांकित अमोनातोव्ह आणि अलेक्सेज अलेक्झांड्रोव्ह यांच्याशी 8.5 गुणांसह बरोबरी साधली. या वेळी विजेतेपदाची चुरस कळसाला पोहोचली होती.मात्र टायब्रेकरमध्ये बाजी मारताना अमोनातोव्हने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तरअलेक्झांड्रोव्हने दुसरा क्रमांक पटकावला. अर्जुन कल्याणला तिसर्या क्रमांकावरसमाधान मानावे लागले असले, तरी त्याची एकंदर कामगिरी नेत्रदीपक ठरली.त्याआधी अमोनातोव्ह आणि अलेक्झांड्रोव्ह यांच्यातील 11 व्या फेरीची लढत केवळ14 चालींनंतर बरोबरीत सुटली.
संपूर्ण स्पर्धेत चुरशीच्या लढती खेळल्यानंतर यादोघांनीही हा सामना झटपट संपविला. रूय लोपेझ ओपनिंगनंतर दोघांनीही तीन-तीनचालींची पुनरावृत्ती करीत बरोबरी साधली.दीप सेनगुप्ताने कालचा पराभव मागे टाकताना 11 व्या फेरीत अनुज शिवरात्रीवर मातकरीत चौथे स्थान निश्चित केले. टायब्रेकरनंतर लुका पैचाझ, एलआर श्रीहरी आणिकिरिल स्टुपॅक यांनी अनुक्रमे पाचवे, सहावे व सातवे स्थान मिळविले.गुणवान युवा खेळाडू आदित्य मित्तलला अखेरच्या फेरीत लुका पैचाझकडून पराभव पत्करावा लागला.
विजेपदानंतर फारूख अमोनोतोव्ह म्हणाला की, पुण्यातील विजेतेपद माझ्यासाठी खास आहे. कारण याआधी देखील मी पुण्यात स्पर्धा खेळलो आहे आणि या ठिकाणी स्पर्धा खेळण्यास मला नेहमीच आनंद मिळतो. तसेच, पुण्यात माझे मित्रदेखील आहेत, त्यामुळे हे विजेतेपद माझ्यासाठी विशेष आहे.
स्पर्धेतील विजेत्या ताझिकिस्तानच्या फारूख अमोनोतोव्ह याला करंडक व 3लाख रुपये, तर उपविजेत्या बेलारूसच्या अलेक्सड्रोव्ह अलेक्सीजला करंडक व 2लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.याशिवाय तिसरा क्रमांक पटकवणाऱ्या जीएम अर्जुन कल्याणला करंडक 1लाख 50हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एआयसीएफचे अध्यक्ष डॉ.संजय कपूर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रॅन्डमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे व गिरीश चितळे, मानद सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विनय बेले, ट्रूस्पेसचे व पीडीसीसीचे अध्यक्ष अश्विन त्रिमल, चीफ आरबीटर पॉल आलोक्यराज आदी मान्यवर उपस्थित होते
निकाल: 11वी फेरी: व्हाईट व ब्लॅक या नुसार:
जीएम फारूख अमोनोतोव्ह(ताजिकिस्तान)(8.5गुण)बरोबरी वि.जीएम अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज (बेलारूस)(8.5गुण);
जीएम अलेक्सी फेडरोव्ह(बेलारूस)(7गुण) पराभूत वि.जीएम अर्जुन कल्याण (भारत)(8.5गुण);
आयएम आदित्य मित्तल (भारत)(7गुण)पराभूत वि.जीएम पैचाझ लुका(जॅर्जिया)(8गुण);
जीएम दीप सेनगुप्ता (भारत)(8गुण)वि.वि.आयएम अनुज श्रीवत्री(भारत)(7गुण);
आयएम नीलश शहा(भारत)(7.5गुण)बरोबरी वि.जीएम सावचेन्को बोरिस (रशिया)(7.5गुण);
जीएम निकितेन्को मिहेल(बेलारूस)(7गुण)पराभूत वि.आयएम श्रीहरी एल.आर(भारत)(8गुण);
जीएम स्तूपक किरील(बेलारूस) (8गुण)वि.वि.सीएम कुशाग्र मोहन(भारत)(7गुण);
आयएम कृष्णा तेजा एन(भारत)(7.5गुण)वि.वि.जीएम ललित बाबू एम.आर(भारत)(6.5गुण);
जीएम गुयेन ड्यूक होआ(व्हिएतनाम) (6.5गुण)पराभूत वि.जीएम वेंकटेश एमआर(भारत)(7.5गुण);
आयएम भक्ती कुलकर्णी(भारत)(6.5गुण)पराभूत वि.जीएम दीपन चक्रवर्ती जे(भारत)(7.5गुण);
इतर पारितोषिके:
उत्कृष्ट ऊभरते खेळाडू (बेस्ट एमर्जिंग प्लेअर):
1. आयएम श्रीहरी एल.आर, 2. डब्ल्यूजीएम दिव्या देशमुख;
2400च्या खालील(below 2400):
1. सीएम कुशाग्र मोहन, 2. आयएम राहूल व्ही.एस, 3. एफएम रोहित कृष्णन एस
2300च्या खालील(below 2300):
1. आयएम सर्वाना कृष्णन पी, 2. आयएम संगमा राहूल, 3. एफएम जूबिन जिम्मी
2200च्या खालील(below 2200):
1. एफएम राम अरविंद एल.एन, 2. अनिश गांधी, 3. आयएम प्रविण कुमार सी
2100च्या खालील(below 2100):
1. यश भराडीया, 2. आकाश दळवी, 3. डब्ल्यूजीएम किरण मोहंती
महाराष्ट्र खेळाडू
1. आयएम विक्रमादित्य कुलकर्णी, 2. आयएम मोहम्मद शेख, 3. एफएम सुयोग वाघ, 4. अथर्व गोडबोले, 5. आयएम अनुप देशमुख
महिला खेळाडू
1. आयएम भक्ती कुलकर्णी, 2. डब्ल्युजीएम दिव्या देशमुख, 3. डब्ल्युआयएम प्रियांका नुटक्की, 4. डब्ल्युजीएम मेरी एन् गोम्स, 5. डब्ल्युजीएम श्रीजा सेशाद्री
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘कर्णधार’ आझम विंडीजला पुरून उरला, खणखणीत शतक ठोकत विराटचा विश्वविक्रम मोडला
हे भारीये! फलंदाजाच्या पॅडवर चेंडू लागताच बॉलरसह पंचांनीही केली अपील, पाहा मजेशीर Video