---Advertisement---

टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकांनी शिवम दुबेबद्दल केले मोठे भाष्य; म्हणाले…

On: शनिवार, डिसेंबर 14, 2019 7:24 PM
---Advertisement---

बुधवारी (11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियम, मुंबई (Wankhede Stadium, Mumbai) येथे अंतिम आणि निर्णायक सामना भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात पार पडला. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली.

या टी20 मालिकेत हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) ऐवजी भारतीय संघात स्थान मिळालेल्या शिवम दुबेने (Shivam Dube) उत्कृष्ट कामगिरी केली. या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शिवमने 30 चेंडूत 54 धावांची अर्धशतकी खेळी केली.

शिवम दुबेबद्दल बोलताना भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक अरूण भरत (Arun Bharat) म्हणाले की, या मालिकेत त्याच्या मोठ्या शॉट्सने चाहत्यांचे मन जिंकले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिवम दुबेकडे एक अष्टपैलू (All Rounder Player) खेळाडू बनण्यासाठी सर्व गुण आहेत असे वाटते.

तसेच अरुण म्हणाले की, शिवम दुबे प्रत्येक सामन्यासह सुधारत आहे आणि प्रत्येक सामन्यासह त्याचा आत्मविश्वासही वाढत आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याने चांगली गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजविरूद्ध फलंदाजीचेही कौशल्य दाखविले.

ते म्हणाला, ‘शिवम एक चांगला खेळाडू आहे आणि मला वाटते की प्रत्येक सामन्यासह त्याचा आत्मविश्वास वाढत आहे. त्याच्या गोलंदाजीकडेही जर तुम्ही पाहिले तर वेस्ट इंडीजविरुद्ध मुंबईत (Mumbai) पहिला षटक (तिसरा टी20 सामना) टाकल्यानंतर त्याने केलेले पुनरागमन आश्चर्यकारक होते.’

“षटकात जास्त धावा देऊनही विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्यावर आत्मविश्वास दाखविला. जेणेकरून तो चांगली गोलंदाजी करू शकेल,” असेही अरुण म्हणाले.

रविवारी (8 डिसेंबर) खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी अरुण म्हणाले की, “मला वाटते की तो आमच्यासाठी एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याचा आत्मविश्वास वाढला की तो एक उत्तम अष्टपैलू खेळाडू होईल.”

विश्वचषक स्पर्धेपासून फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) संघात एकत्र दिसले नाहीत.

“संघाला संपूर्ण संतुलन मिळवून देण्यासाठी एक आदर्श संयोजन तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याकडे रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) अष्टपैलू म्हणून वापरण्याचा पर्याय आहे. हे आम्हाला खूप मदत करेल,” असेही अरुण यावेळी म्हणाले.

https://twitter.com/Maha_Sports/status/1205491389485604864

https://twitter.com/Maha_Sports/status/1205479939396341768

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---