लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२२च्या आपल्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला ६ विकेट्सने धूळ चारली. गुरुवारी (०७ एप्रिल) मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी स्टेडिअमवर दिल्लीविरुद्ध पार पडलेला सामना खिशात घालून लखनऊने हंगामातील तिसरा विजय मिळवला. विशेष म्हणजे, यावेळी क्विंटन डी कॉकच्या शानदार अर्धशतकी खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. असे असले, तरी अंतिम षटकात युवा फलंदाज आयुष बदोनीने केलेल्या वादळी खेळीमुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झालीये.
या सामन्यात दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ३ विकेट्स गमावत १४९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाला अंतिम षटकात ५ धावांची आवश्यकता होती. यावेळी खेळपट्टीवर असलेला दीपक हुड्डा २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यावेळी त्याने ११ धावा केल्या होत्या. त्यानंतर लखनऊचा किल्ला लढवण्यासाठी फलंदाजीला आयुष बदोनी (Ayush Badoni) आला. बदोनीने अंतिम षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एकही धाव घेतली नाही. मात्र, त्याने तिसऱ्या चेंडूवर जोरदार चौकार ठोकला आणि त्यानंतर पुढच्या चौथ्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत संघाला सामना जिंकून दिला.
यासह तो या हंगामात लखनऊ संघाला षटकाराने सामना जिंकून देणारा पहिलाच खेळाडू ठरला. बदोनीने ३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १० धावा केल्या. या धावा त्याने ३३३.३३च्या स्ट्राईक रेटने काढल्या. अशीच कामगिरी प्रत्येक संघासाठी त्यांच्या धडाकेबाज खेळाडूंनी केली आहे. त्यावर आपण नजर टाकूया.
कोलकाता नाईट रायडर्स संघाला षटकार मारून विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूचे नाव डेव्हिड हसी आहे. तसेच, राजस्थान रॉयल्ससाठी अशी कामगिरी शेन वॉर्नने, चेन्नई सुपर किंग्जसाठी एमएस धोनीने, दिल्ली कॅपिटल्स संघासाठी शिखर धवनने, पुन्हा राजस्थान रॉयल्स संघासाठी युसूफ पठाणने, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी बालचंद्र अखिलने, मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने, सनरायझर्स हैदराबादसाठी थिसारा परेराने आणि आता लखनऊ संघासाठी आयुष बदोनीने अशी कामगिरी केली आहे.
आयपीएल संघांसाठी विजयी षटकार मारणारे प्रथम फलंदाज
कोलकाता- डेविड हसी
राजस्थान- शेन वॉटसन
चेन्नई- एमएस धोनी
दिल्ली- शिखर धवन
राजस्थान- युसूफ पठाण
बेंगलोर- बालचंद्र अखिल
मुंबई- रोहित शर्मा
हैदराबाद- थिसारा परेरा
लखनऊ- आयुष बदोनी*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडले लखनऊचे फलंदाज; ४ विकेट्स गमावत खेळ केला खल्लास
पदार्पणाच्या सामन्यातच ‘बेबी एबी’ने ठोकला गगनचुंबी ‘नो लूक सिक्स’, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक