---Advertisement---

विराट कोहली म्हणतो, आयसीसीची ही कल्पना ठरु शकते मोठी चूक

On: रविवार, जानेवारी 5, 2020 3:59 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) व्यस्त वेळापत्रकातील वेळ वाचवण्याच्या दृष्टीने 2023 पासून सुरु होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशिपमधील सामने चार दिवसीय करण्याचा विचार करीत आहे. मात्र या कल्पनेवर भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) विरोध केला आहे.

विराट आयसीसीच्या या प्रस्तावाला विरोध करत म्हणाला की कसोटी सामन्यांमध्ये कोणताही बदल केला नाही पाहिजे. रविवारी (5 जानेवारी) भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी विराटने आपले मत व्यक्त केले आहे.

माध्यमांशी बोलताना विराट म्हणाला की, “माझ्या मते यामध्ये (कसोटी) कोणताही बदल करण्यात आला नाही पाहिजे. जसं मी म्हणालो क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी दिवस-रात्र कसोटी क्रिकेट खेळवण्यात येत आहे. त्यामुळे उत्साह निर्माण होतो. परंतु या कसोटी क्रिकेट प्रकाराशी जास्त छेडछाड केली नाही पाहिजे. मला नाही वाटत की असे केले पाहिजे.”

आयसीसीच्या या कल्पनेवर विराटपूर्वी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मौन पाळले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन (Tim Paine), ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath), नॅथन लायन (Nathon Lyon), तसेच दक्षिण आफ्रिकेच्या वर्नोन फिलँडर (Vernon Philander) यांनीही या प्रस्तावाला विरोध दर्शविला होता.

परंतु, इंग्लंडच्या जाॅस बटलरने (Jos Buttler) आयसीसीच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (Cricket Australia) प्रमुख केविन रॉबर्ट्स (Kevin Roberts) यांच्याबरोबर अनेकांनी पाठिंबा दिला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---