सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी२० ब्लास्टमध्ये पहिल्यांदाच रविवारी एकाच सामन्यात दोन फलंदाजांनी संघाच्या हिताचा निर्णय घेत रिटायर्ड आऊट झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. कार्लोस ब्रॅथवेट आणि समित पटेल हे दोन फलंदाज होते ज्यांनी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे झालेल्या टी२० ब्लास्ट सामन्यादरम्यान रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला. मात्र, यानंतर पुढील दोन्ही फलंदाज संघाला संकटातून बाहेर काढण्यात आणि विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.
टी२० ब्लास्टमधून निवृत्त झाल्याचे हे प्रकरण बर्मिंगहॅममधील नॉटिंगहॅमशायर आणि वॉर्विकशायर यांच्यातील सामन्यादरम्यान पाहायला मिळाले. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात वॉर्विकशायरला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. पावसामुळे सामना आठ षटकांचा करण्यात आला. वॉरविक्शायरने पाच गडी बाद ९८ धावा केल्या होत्या.
Tactical masterstroke? 🤔
Carlos Brathwaite retires out to be replaced by Sam Hain for the final over!
Watch it unfold LIVE: https://t.co/ScNplvlY5n#Blast22 pic.twitter.com/RwCKpCVPSK
— Vitality Blast (@VitalityBlast) June 5, 2022
नॉटिंगहॅमशायरकडून ९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कार्लोस ब्रॅथवेट ११ चेंडूत १७ धावा करत खेळत होता. तेव्हाच त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या सॅम हॅनला फार काही करता आले नाही आणि तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर ३७ वर्षीय समित पटेलही सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. नॉटिंगहॅमशायरला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती, परंतु संघ केवळ एक धाव करू शकला आणि एका धावांनी पराभूत झाला.
You cannot make this up! 😂
Samit Patel also retires himself out off the penultimate ball of the match! #Blast22 pic.twitter.com/Q2fPLRe7A5
— Vitality Blast (@VitalityBlast) June 5, 2022
दरम्यान, याआधी आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हंगामातील २०व्या सामन्यात आर अश्विन फलंदाजी करताना अचानक मैदान सोडून गेला तेव्हा एक विचित्र दृश्य दिसले. यादरम्यान अंपायरनेही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण अश्विन थेट डगआउटमध्येच जाऊन थांबला. संघाच्या हिताचा निर्णय घेत अश्विनने स्वत:ला निवृत्त घोषित केले होते जेणेकरून पुढे येणाऱ्या फलंदाजांना वेगाने धावा करता याव्यात. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना लखनौसमोर १६६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अश्विनने २८ धावा केल्या होत्या.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हे फक्त माहीच करू शकतो! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोनीचा पुढाकार, लढवली भन्नाट शक्कल
इंस्टाग्रामचा कोहलीच ‘किंग’! विराट मोठ्या उपलब्धीच्या नजीक, बनणार जगातील एकमेव क्रिकेटर