भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक २०२२ मध्ये खूपच व्यस्त असणार आहे. आयपीएलचा १५ वा हंगाम संपल्यानंतर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकी संघासोबतची मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी मात्र अद्याप संघाची घोषणा केली गेली नाहीये. माहितीनुसार बोर्ड या दौऱ्यासाठी भारताचा युवा संघ पाठवू शकते. अशात आपण या लेखात अशा पाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, जे आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडले जाऊ शकतात.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे तिन्ही दिग्गज या मालिकेसाठी उपलब्ध नसल्यामुळे युवा खेळाडूंनी संधी दिली गेली आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात निवडले गेले आहे आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
आयर्लंडविरुद्ध भारताला २ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे, जी २६ जूनपासून सुरू होईल. याच कालावधीदरम्यान भारताचा प्रमुख संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात मागच्या वर्षी रााहिलेला कसोटी मालिकेचा शेवटचा सामना १ जुलैपासून खेळला जाणार आहे. परंतु त्या सामन्याच्या आधी भारताला इंग्लंडमध्ये एक सराव सामना खेळायचा आहे. अशात बोर्ड इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा प्रमुख संघ पाठवणार असून आयर्लंड दौऱ्यात मात्र युवा खेळाडूंना संधी दिली गेली जाईल. चला तर जाणून घेऊया आयर्लंडविरुद्ध भारताच्या कोणत्या युवा खेळाडूंना संधी मिळू शकते?
१. राहुल तेवतिया
आयपीएल २०२२ मध्ये राहुल तेवतिया (Rahul Tewatia) गुजरात टायट्सनचे प्रतिनिधित्व करत होता. त्याने संपूर्ण हंगामात गुजरातसाठी एका उत्कृष्ट फिनिशरची भूमिका पार पाडली. त्या हंगामातील अनेक सामन्यांचा शेवट करत गुजरातला विजय मिळवून दिला. सर्वात अविस्मरनीय सामना म्हणजे गुजरात आणि पंजाब यांच्यातील. गुजरातला या सामन्यात शेवटच्या २ चेंडूत १२ धावांची गरज होती. तेवतियाने शेवटच्या दोन्ही चेंडूवर षटकार मारले आणि सामना जिंकवून दिला. त्याने या हंगामात खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये १४७.६२ च्या स्ट्राईक रेटने २१७ धावा केल्या. त्याची गुणवत्ता पाहून निवडकर्ते त्याला आयर्लंडविरुद्ध खेळण्याची संधी देतील अशी अपेक्षा आहे.
२. रजत पाटीदार
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात रजत पाटीदार (Rajat patidar) याला खरेदी करण्यासाठी एकही फ्रँचायझी इच्छुक नव्हती. पण आरसीबीचा लवनिथ सिसोदिया जेव्हा दुखापतीमुळे हंगामातून बाहेर पडला, तेव्हा आरसीबीने पाटीदारला बदली खेळाडूच्या रूपात संधी दिली. पाटीदारने या संधीचा पूर्ण फायदा उचलला आहे. अवघ्या ८ सामन्यांमध्ये ५५ च्या सरासरीने ३३३ धावा केल्या. एलिमिनेटरसारख्या महत्वाच्या सामन्यात त्याने अवघ्या ४९ चेंडूत शतक ठोकले आणि आरसीबीला विजय मिळवून दिला. या प्रदर्शनाच्या जोरावर पाटीदारला देखील आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता बनली आहे.
३. मोहसिन खान
वेगवान गोलंदाज मोहसिन खान (Mohsin Khan) साठी हा त्याचा आयपीएल पदार्पणाचा हंगाम होता. त्याने यावर्षी खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये अवघ्या ५.९३ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आणि १४ विकेट्स घेतल्या. या युवा गोलंदाजाचे घातक प्रदर्शन पाहून जाणकार प्रभावित झाले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सला प्लेऑमध्ये पोहोचवण्यासाठी त्याची भूमिका नक्कीच महत्वाची ठरली. अशात मोहसिनला देखील आयर्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेत संधी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
४. राहुल त्रिपाठी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) खेळताना दिसण्याची शक्यता होती, पण संघात त्याची निवड झाली नाही. आयपीएल २०२२ मध्ये राहुल कोलकाता नाईट रायडर्सचा महत्वाचा खेळाडू ठरला. त्याने हंगामात खेळलेल्या १४ सामन्यामध्ये १५८ च्या स्ट्राईक रेटने ४१३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी त्याचा विचार केला नसला, तरी आयर्लंडविरुद्ध मात्र त्याला नक्कीच संधी मिळू शकते.
५. तिलक वर्मा
आयपीएल २०२२ हंगामात युवा फलंदाज तिलव वर्मा (Tilak Varma) मुंबई इंडियन्ससाठी चांगला खेळला. त्याचे प्रदर्शन पाहून एक गोष्ट नक्की झाली की, तो भारतीय संघासाठी भविष्यातील मोठा खेळाडू बनू शकतो. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये ३६.०९ च्या स्ट्राईक रेटने ३९७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३१.०२ राहिला आणि त्याने दोन वेळा अर्धशतकी खेळी केली. आयपीएल पदार्पणाच्या हंगामात त्याने केलेले प्रदर्शन खरोखर कौतुकास पात्र आहे. भारत-आयर्लंड यांच्यातील टी-२० मालिकेत तिलक वर्मा मध्यक्रमात फलंदाजी करताना दिसू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
धोनी, सेहवाग, रैना सर्वच झाले निवृत्त, पण ‘त्या’ सामन्यात खेळलेला कार्तिक आजही टीम इंडियात
रहाणे आणि शर्माचे वय झालंय; ऑस्ट्रेलियच्या दिग्गज खेळाडूचे मोठे विधान
आरसीबीने नाही दिला चान्स, पण इंग्लंडच्या टी२० लीगमध्ये गाजलाय ‘हा’ खेळाडू