---Advertisement---

2 मोठे बदल करून मैदानात उतरू शकतो भारतीय संघ, भारत-पाक सामन्यापूर्वी संघ घेऊ शकतो मोठे निर्णय

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2025 9:41 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना (23 फेब्रुवारी) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आता दोन्ही संघ प्रत्येकी एक सामना खेळला आहे. एकीकडे टीम इंडियाने त्यांचा सामना जिंकला, तर दुसरीकडे पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करला. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध दमदार कामगिरी केली होती, परंतु पाकिस्तानविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा असेल. जाणून घेऊया पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कोणते 2 मोठे बदल करू शकतो.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हर्षित राणाला दुसरा मुख्य वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळाले. हर्षितने त्याच्या वेग आणि उसळीने प्रभाव पाडला आणि एकूण 3 विकेट घेतल्या. पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, टीम इंडियाने डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजासह खेळावे अशी मागणी शिगेला पोहोचली होती. पाकिस्तान संघाच्या मुख्य फलंदाजांपैकी एक बाबर आझमला डाव्या हाताच्या गोलंदाजांकडून सतत त्रास होत आहे. पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांमध्ये अर्शदीपचे आकडे हे सिद्ध करतात की तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असण्यास पात्र आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवला खेळवण्यात आले. त्याने 10 षटकांच्या स्पेलमध्ये 43 धावा देऊन एकही विकेट घेतली नाही. त्याच्या चेंडूंचा दुबईच्या खेळपट्टीवर कोणताही परिणाम दिसून आला नाही. भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले जाणार असल्याने, टीम इंडियाने वरुण चक्रवर्तीला आणण्याचा विचार करावा. वरुण सध्या खेळण्याच्या खूप चांगल्या मूडमध्ये आहे. भारत 4 फिरकीपटूंचा गोलंदाजांचा पर्याय देखील घेऊ शकतो, अशा परिस्थितीत एका फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमधून वगळता येईल.

 

महत्वाच्या बातम्या :

भारतीय संघाची चिंता वाढली! यष्टीरक्षकाला ताप, काय म्हणाला शुबमन गिल.??

इंग्लंडच्या बेन डकेटने रचला नवा इतिहास, भारतीय दिग्गजांना सोडले मागे!

पाकिस्तानी मैदानावर भारतीय राष्ट्रगान! PCB वर सोशल मीडियावरती तुफान टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---