---Advertisement---

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला संघाच्या शिबिरासाठी २० खेळाडूंची यादी जाहीर.

On: बुधवार, जून 26, 2019 1:15 AM
---Advertisement---

मुंबई: भारतीय हौशी कबड्डी महासंघ वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद महिला कबड्डी स्पर्धा दि. ११ जुलै ते १४ जुलै २०१९ या कालावधीत पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पटना येथे आयोजित करण्यात आली आहे.

पटना येथे होणाऱ्या ६६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद महिला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघाच्या निवडी करता २० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सिन्नर-नाशिक येथे झालेल्या ६६ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून २० महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

दिनांक २८ जून २०१९ ते ६ जुलै २०१९ या कालावधी मध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल, रायगड येथे सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरातून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र प्रतिनिधिक संघातील अंतिम १२ खेळाडूंची निवड दिनांक ३० जुन २०१९ रोजी करण्यात येईल.

महाराष्ट्र महिला संघाच्या प्रशिक्षकपदी अर्जुन पुरस्कार विजेते श्री राजू भावसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर संघ स्पर्धेसाठी ९ जुलै २०१९ रोजी सकाळी ८ वाजता मुंबई येथून पटना येथे रवाना होईल.

शिबिरासाठी निवड करण्यात आलेला २० खेळाडूंची यादी:

१) अर्चना नारायण करडे (ठाणे)
२) स्नेहा अनिल टिळवे (सिंधुदुर्ग)
३) तेजस्वी विश्वनाथ पाटेकर (मुंबई उपनगर)
४) ललित अरुण घरट (रत्नागिरी)
५) प्रिती संजय कारवा (कोल्हापूर)
६) अंकिता अजित जगताप (पुणे)
७) कोमल सुभाष देवकर (मुंबई उपनगर)
८) सायली उदय जाधव (मुंबई उपनगर)
९) सायली संजय केरीपाळे (पुणे)
१०) अनिता विनोद भोईर (रायगड)
११) स्नेहल प्रदीप शिंदे (पुणे)
१२) ऐश्वर्या मनोज काळे (पालघर)
१३) सोनाली रामचंद्र हेळवी (सातारा)
१४) पूजा जयप्रकाश यादव (मुंबई शहर)
१५) श्रद्धा विनायक पवार (रत्नागिरी)
१६) ज्योती पोपट पवार (नाशिक)
१७) दीपिका हेन्री जोसेफ (पुणे)
१८) सायली सुभाष नागवेकर (मुंबई उपनगर)
१९) सुवर्णा भुजंग लोखंडे (अहमदनगर)
२०) आम्रपली जगदीश गलांडे (पुणे)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment