---Advertisement---

….आणि क्रिकेटमध्ये घडला ‘बाप’ योगायोग

On: मंगळवार, ऑगस्ट 21, 2018 12:00 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने कसोटीतील २३वे शतक केले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकुण ५८वे शतक होते.

विराटने वनडेत ३५ तर कसोटीत २३ अशी एकुण ५८ शतके केली आहेत.

काल त्याने जेव्हा हे शतक केले तेव्हा क्रिकेटमध्ये एक खास योगायोग झाला.

विराटने ५८वे शतक करताना १०३ धावा केल्या तर सचिननेही कारकिर्दीतील ५८वे शतक करताना १०३च धावा केल्या होत्या.

विशेष म्हणजे दोन्ही वेळा संघ हा इंग्लंडच होता. सचिनने हा पराक्रम १३ डिसेंबर २००१मध्ये अहमदाबाद कसोटीत केला होता. तेव्हा तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

तर काल जेव्हा विराटने हा पराक्रम केला तेव्हा तो देखील चौथ्याच क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

तो सामना अनिर्णित राहिला होता परंतु सचिनला सामनावीर म्हणुन घोषीत करण्यात आले होते.

सध्या २९ वर्ष आणि ९ महिने वय असलेल्या विराटने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळुन ५८ शतकांच्या मदतीने ३४२ सामन्यात ५५.६८च्या सरासरीने १७८७५ धावा केल्या आहेत.

तर जेव्हा सचिनने हा कारनामा केला तेव्हा त्याचे वय २८ वर्ष आणि ७ महिने होते आणि त्याने तेव्हा कारकिर्दीत ३६८ सामन्यात ४८.४८च्या सरासरीने १८१३२ धावा केल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीने माजी कर्णधार अझरचा २७ वर्ष जुना विक्रम मोडला

या कारणामुळे रहाणे तिसऱ्या कसोटीत चमकला

मुंबईकडून ९९ प्रथम श्रेणी सामने खेळणारा नायर आता पाँडिचेरीकडून खेळणार रणजी सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment