---Advertisement---

विशाखापट्टणममध्ये झाली 14 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती! गुवाहाटीत ऑस्ट्रेलियानेच दिलेली भळभळती जखम

On: रविवार, मार्च 19, 2023 8:56 PM
ind VS aus
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला.‌ पाहुण्या संघाने मुंबई येथे झालेल्या पराभवाचे उट्टे काढत यजमान भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभूत केले. अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पाच बळी मिळवल्यानंतर 117 धावांचा पाठलाग करताना मिचेल मार्श व ट्रेविस हेड यांनी नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या या कामगिरीनंतर 14 वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका पराभवाची अनेकांना आठवण झाली.

पावसाच्या सावताखाली खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मिचेल स्टार्क याने पहिल्या सामन्यातील आपला फॉर्म कायम राखला. भारतीय संघाचा डाव 117 धावांवर गुंडाळण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याने 53 धावांवर 5 बळी मिळवले. सीन ऍबॉटने तीन आणि नॅथन एलिसने दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत सर्व बळी वेगवान गोलंदाजांनी मिळवण्याचे कामगिरी करून दाखवली.

ऑस्ट्रेलिया संघाने 2009 मध्ये भारत दौऱ्यावर देखील अशाच प्रकारची कामगिरी केली होती. सात सामन्यांच्या मालिकेतील सहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तीन वेगवान गोलंदाजांनी मिळून भारताचे सर्व 10 गडी बाद केले होते. त्यावेळीही डावखुरा वेगवान गोलंदाज डग बोलिंगर याने 5, मिचेल जॉन्सनने 3 व शेन वॉटसन याने 2 फलंदाजांना बाद केलेले. या सामन्यात भारतीय संघाचा डाव केवळ 170 धावांवर संपुष्टात आला होता.

या सामन्यात भारताकडून रवींद्र जडेजा व प्रवीण कुमार या सातव्या व नवव्या क्रमांकावरील फलंदाजांनी अर्धशतके पूर्ण केलेली. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावत विजयासाठी मिळालेले आव्हान पार करत मालिका आपल्या नावे केली होती.

(2009 India Tour All Australia Pacers Took India 10 Wickets In Guwahati ODI Like Vishakhapatnam ODI)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दोन महिन्यांतच टीम इंडियाने पाहिले अर्श आणि फर्श! ऑस्ट्रेलियाने सोपवली वनडे इतिहासातील सर्वात मोठी हार
मार्शसमोर भारतीय गोलंदाज फेलच! आजवर वनडेत नेहमी केलीये धुलाई, पाहा ही आकडेवारी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---