सिडनी। भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांची आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे.
कारण सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरु असणाऱ्या भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया एकादश यांच्यातील सराव सामन्यात भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ आज(30 नोव्हेंबर) दुखापतग्रस्त झाला आहे. त्याला क्षेत्ररक्षण करताना झेल घेण्याच्या प्रयत्नात पायाच्या घोट्याची दुखापत झाली आहे.
त्यामुळे त्याला लगेचच दवाखान्यात नेण्यात आले आहे. तसेच बीसीसीआयने सांगितले आहे की या दुखापतीमुळे तो 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. तसेच अजून त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबद्दल बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही.
मात्र त्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या कसोटी मालिकेची सुरुवात धक्कादायक झाली आहे.
याआधीही भारत अशा परिस्थितीला सामोरे गेला आहे. कारण जेव्हा भारतीय संघाने 2014 मध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी गेली होती, तेव्हाही पहिल्या सामन्यापूर्वी त्यावेळचा भारताचा नियमित कर्णधार एमएस धोनी दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकला होता.
विशेष म्हणजे त्यावेळीचा पहिला सामनाही अॅडलेड येथे पार पडला होता. त्या सामन्यात धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. भारताला त्या सामन्यात 48 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
तसेच तो सामनाही डिसेंबर महिन्यात झाला होता. तो सामना ब्रिस्बेन येथे 4 डिसेंबर पासून सुरु होणार होता. मात्र आॅस्ट्रलियाचा फलंदाज फिलीप ह्यूजच्या अपघाती निधनामुळे हा सामना ब्रिस्बेनमधून हलवून 9-13 डिसेंबर दरम्यान अॅडलेड येथे पार पडला.
तसेच 2014 च्या कसोटी मालिकेप्रमाणेच यावर्षीची 2018 ची आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिले तीन सामने डिसेंबरमध्ये तर एक सामना जानेवारीमध्ये होणार आहे.
2014 ला झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 2-0 असे पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती.
तसेच या मालिकेनंतर भारताने आॅस्ट्रेलियामध्ये अजून एकही कसोटी मालिका खेळलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराटला शत्रू नव्हे, मित्र बनवा; हा अजब सल्ला दिला आहे आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने
–Video: रशीद खानच्या धोनी स्टाईलने विरेंद्र सेहवाग झाला अचंबित
–या कारणामुळे बीसीसीआय नाराज, धोनीसाठी धोक्याची घंटा
–टीम इंडियाला मोठा झटका, पृथ्वी शाॅ पहिल्या कसोटीतून बाहेर