जकार्ता, इंडोनेशिया येथे दि. १८ ते २५ आॅगस्ट २०१८ या कालावधीत होणाऱ्या “एशियन गेम्स” कबड्डी स्पर्धेकरिता आरती बारी यांची पंच म्हणुन निवड झाली आहे.
या स्पर्धसाठी भारतातील ६ पंचांची निवड झाली असून आरती बारी या एकमेव महाराष्ट्रीतील पंच आहेत. ६ पैकी ४ पुरुष तर २ महिला पंचांचा यात समावेश आहे.
पंच आरती बारी यांची ही चौथी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. यापुर्वी त्यांनी २०१६ला अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषकात, तसेच २०१७मध्ये गोरगाॅन, इरान तसेच २०१८मध्ये दुबईत झालेल्या कबड्डी मास्टर्समध्ये झालेल्या स्पर्धेत पंच म्हणुन काम पाहिले होते. तसेच त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्येही पंच म्हणुन काम पाहिले आहे.
यावर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तसेच फेडरेशन कप स्पर्धेतही त्यांनी पंच म्हणुन चांगली कामगिरी केली होती.
या स्पर्धेसाठी निवड झालेले भारतीय पंच
आरती बारी (महाराष्ट्र), सुश्मिता दास (ओरीसा), सुंदरराज (तामिळनाडू), रोनक पटेल (गुजरात), किसनलाल (हिमाचल प्रदेश), एनकेएस राज शिवन्ना (कर्नाटक).
कबड्डीमधील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा कबड्डीसाठीचे देशातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १चे वेबपोर्टल महा स्पोर्ट्स. तसेच आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फाॅलो करायला विसरु नका.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अॅंडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
-खेळात मैत्री नाहीच! आयपीएलमधील मैत्री विसरुन हा खेळाडू आता काढणार भारतीय गोलंदाजांची पिसे
–वाढदिवस विशेष-आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच जितेश शिरवाडकर यांची खास मुलाखत