दुबई येथे दि. २२ ते ३० जून २०१८ या कालावधीत होणाऱ्या “मास्टर दुबई कबड्डी” स्पर्धेकरिता भारतीय हौशी कबड्डी महासंघाने गेल्या आठवड्यात १४ जणांचा पुरुषांचा संघ जाहीर केला.
या १४ खेळाडूंमध्ये महाराष्ट्राचे रिशांक देवडिगा आणि गिरीश इरनाक या दोन खेळाडूंचा समावेश आहे.
याबरोबर या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील आरती बारी आणि जितेश शिरवाडकर यांची सामनाधिकारी / पंच म्हणुन निवड झाली आहे.
पंच आरती बारी यांची ही तिसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. यापुर्वी त्यांनी २०१६ला अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषकात, तसेच २०१७मध्ये गोरगाॅन, इरानमध्ये झालेल्या स्पर्धेत पंच म्हणुन काम पाहिले होते. तसेच त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्येही पंच म्हणुन काम पाहिले आहे.
यावर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तसेच फेडरेशन कप स्पर्धेतही त्यांनी पंच म्हणुन चांगली कामगिरी केली होती.
मास्टर दुबई कबड्डी स्पर्धेसाठी यावेळी १० भारतीय पंचांची निवड केली आहेत. त्यात २ पंच हे महाराष्ट्रीयन आहेत तर १० पैकी एकुण ४ पंच ह्या महिला पंच आहेत.
या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, कोरिया या नामवंत देशाचे संघ सहभागी होणार आहेत.
कबड्डीच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या-
–मास्टर दुबई कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघ जाहीर
–प्रो-कबड्डी लिलावात महाराष्ट्राचे हे खेळाडू झाले मालामाल
–४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख
–संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती