एशिया कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवारी (28 सप्टेंबर) भारत आणि बांग्लादेश यांच्यात अंतिम सामना दुबईत होणार आहे. हा सामना भारत पाकिस्तान यांच्यात होणाची चाहत्यांना अपेक्षा होती. भारत पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक होत असतात.
दोन्ही देशांची सरकारे एकमेकांशी बोलणी करण्यास उत्सुक नसताना भारताचा सुधीर कुमार आणि पाकिस्तानचा मोहम्मद बशीर यांनी सिद्ध करुन दाखवलं की क्रिकेटला कुठल्याही देशाच्या सिमा नसतात.
मोहम्मद बशीर या चाहत्याने आपला मित्र आणि भारतीय संघाचा चाहता सुधीर कुमारला मनमोकळेपणाने मदत करत दुबईतील सामन्याचे तिकिट आणि टीम इंडियाचा मुक्काम ज्या हॉटेलात आहे. त्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे.
सुधीर कुमारचा लहानपणीचा हिरो आणि त्याला प्रायजोकत्व देणारा सचिन काही कारणाने दुबईला येवू शकला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या कुमारला बशीरने मदत केली आहे.
सुधीर कुमार हे बिहार मधील मजफ्फरपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी भारतीय संघाला पांठींबा देण्यासाठी जगभर प्रवास केला आहे.
बशीरला भारताच्या महेंद्रसिंग धोनीने अनेकदा सामन्यांची तिकिट दिली आहेत.बशीर यांची पत्नी ही हैदराबादची आहे,म्हणून ते भारतीय संघाला पाठिंबा देतात तर जन्मनाने पाकिस्तानी असल्याने आपण पाकिस्तानला पाठिंबा देत असतो असे बशीरने सांगितले.
त्या दोघांची मैत्री 2011 साली विश्वचषक स्पर्धेत झाली होती. त्यानंतर दोघेही सोबतच मॅच पाहत असतात. बशीरने आपल्याला ही मदत केल्याने आंनद झाल्याचे सुधीर कुमारने सांगितले आहे.
सुधीर कुमारने 64 कसोटी सामने,300 वन-डे आणि 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने पाहिले आहेत. 2006 साली भारत पाकिस्तान यांच्यात झालेली मालिका सर्वात स्मरणीय असल्याचे त्याने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
–महाराष्ट्राचे राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीर २८सप्टेंबरपासून तीन दिवस पुण्यात
–Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो
–टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव