फुटबॉल विश्वचषकाला तीन दिवस शिल्लक राहिले असताना अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने त्याच्या आंतराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
स्पॅनिश डेली या वृत्तपत्राशी बोलताना मेस्सी म्हणाला “माझी आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्द रशियात होत असलेल्या फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिनाची कामगिरी कशी होईल यावर अवलंबून असेल.
मेस्सी म्हणाला 2014 चा विश्वचषक व 2015 आणि 2016 च्या कोपा अमेरीका चषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवामुळे आम्ही अर्जेंटिनाच्या चाहत्यांना निराश केले आहे.
या विश्वचषकात सामिल झालेले खेळाडू व संघ खूप प्रतिभावान आहेत. त्यामुळे जिंकायचे असेल तर आम्हाला सर्वोत्तंम खेळ करण्याशिवाय पर्याय नाही.”
विश्वचषकाच्या ‘ड’ गटात अर्जेेंटिना बरोबर क्रोएशिआ, आइसलँड आणि नाइजेरीया हे संघ असतील.
मेस्सीच्या मते ब्राझिल, फ्रान्सं, जर्मनी, स्पेन आणि बेल्जीयम या विश्वचषक विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असतील.
अर्जे्टिनाच्या विश्वचषक मोहिमेला शनिवारपासून सुरवात होत आहे.
मेस्सींने क्लब स्तरावर जरी अनेक पराक्रम केले असले तरी त्याला आजपर्यंत कोपा अमेरिका किंवा विश्वचषक जिंकता आला नाही. मेस्सी संघात असताना अर्जेटिनाने तिनदा कोपा अमेरिका व 2014 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती पण विजेतेपद मिळवण्यात प्रत्येकवेळी तो अपयशी ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या:
–रोनाल्डो-मेस्सी बरोबर माझी तुलना करणे अयोग्य- सुनिल छेत्री
–भारताचा स्टार फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सीला पडतोय भारी!
–फुटबॉल फॉर्मेशन म्हणजे नक्की काय रे भाऊ?
–मेस्सीच्या कोलकात्यामधील चाहत्याने घरालाच दिला अर्जेंटीनाच्या जर्सीचा रंग