मुंबई | प्रो-कबड्डीचा आजवरचा विक्रम मोडीत काढत यु-मुंबाने प्रो-कबड्डीमध्ये इराणच्या फजल अत्राचलीला चक्क 1 कोटी रुपये मोजले.
यावेळी यु-मुंबा आणि जयपुर पिंक पॅंथरने मोठ्या प्रमाणावर बोली लावल्या. त्यात यु-मुंबाने चक्क दोन वेळा ही बोली 20 लाखांनी वाढवली.
त्याचा जुना संघ गुजरातने त्याला रिटेन करण्यात सारस्य दाखवले नाही. त्यामुळे हा खेळाडू यु-मुंबाच्या ताफ्यात आला.
याबरोबर तो प्रो-कबड्डीमधील पहिला असा खेळाडू ठरला ज्याने कोटींचा आकडा पार केला. हा खेळाडू बचाव फळीत डाव्या बाजूला खेळतो. 56सामन्यात 152 गुण त्याने टॅकलमधून मिळवले आहे.
त्याच्याशी आज संवाद साधला असता त्याने या बोलीबद्दल आनंद व्यक्त केला. “मला खुप आनंद होत आहे. मी माझं दुसरे घर असलेल्या मुंबईमध्ये परतल्यामुळे हा आनंद द्विगुणित होत आहे. मला यु-मुंबाचा आदर आहे कारण मी येथे दोन हंगाम खेळलो आहे. मला एवढी मोठी रक्कम लिलावात मिळाली याचा खुप आनंद होत आहे. मी सर्वांचे आभारी आहे.” असे यावेळी तो म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली
–या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड
–महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध
–आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम
–कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम







