मुंबई | रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवलायाबरोबर चेन्नईला आयपीएलमधील तिसरे विजेतेपदही मिळाले.
याबरोबर आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ होण्याचा मान मुंबईकडून चेन्नईकडे आला. याला कारण म्हणजे जरी हे दोन्ही संघ प्रत्येकी ३ वेळा विजेतेपदं जिंकले असले तरी चेन्नईने तब्बल ७ फायनल तर मुंबईने ४ फायनल खेळल्या आहेत.
चेन्नईची ही ९वी आयपीएल होती. २०१६ आणि २०१७मध्ये हा संघ या स्पर्धेत खेळला नाही. परंतु बाकी ९ हंगामात मात्र या संघाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे.
हा संघ कधीही गुणतालिकेत पहिल्या ४ क्रमांकांच्या खाली गेला नाही. २०१०, २०११ आणि २०१८मध्ये हा संघ आयपीएल विजेता ठरला. २००८, २०१२, २०१३ आणि २०१५मध्ये हा संघ उपविजेता ठरला तर २०१४ला तिसऱ्या तर २००९ला चौथ्या स्थानावर राहिला.
यावरुनच या संघाच्या आयपीएलमधील जबरदस्त कामगिरीचा अंदाज येतो.
महत्त्वाच्या बातम्या-
–चेन्नई सुपर किंगमधील खरा ‘किंग’ धोनीच आहे, जाणुन घ्या काय आहे कारण
-धोनी ते वाक्य बोलला आणि चेन्नईच्या चाहत्यांच्या डोळ्यात आले पाणी !
–धोनीबद्दल रैना जे बोलला ते खरे करुन दाखवले!
–सलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू
–म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन