---Advertisement---

जेव्हा गांगुलीने ‘वॉटरबॉय’ बनण्यास दिला होता नकार…

On: रविवार, एप्रिल 26, 2020 12:30 PM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये पदार्पण हे ११ जानेवारी १९९२ ला ब्रिसबेन ऑस्ट्रेलिया येथे वेस्ट इंडिज संघाविरुद्ध केले. परंतु पुढील सामना खेळण्यासाठी या खेळाडूला मोठी वाट पाहावी लागली.

ज्या वेळी भारतीय संघ १९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलिया देशात तिरंगी लढतीसाठी गेला होता तेव्हा त्यावेळी काही मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे राखीव खेळाडू असताना गांगुलीने मैदानावरील खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे गांगुलीला १९९६ पर्यंत संघात स्थान मिळालं नाही. त्यांनतर गांगुलीने १९९६ साली द्रविड बरोबर लॉर्ड्स मैदानावर कसोटी पदार्पण केले.

त्यांनतर भारताच्या या दिग्गज खेळाडूने एका मुलाखतीमध्ये आपण असं काहीही न केल्याच सांगितलं होत. त्यात गांगुलीने फक्त एवढंच सांगितलं की आमच्या संघाबरोबर रनबीर सिंह नावाचा एक मॅनेजर होता आणि त्याच्याएवढी खराब व्यक्ती मी माझ्या जीवनात पहिली नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे की असा मॅनेजर संघाबरोबर होता. याचमुळे माझ्यावर हा चुकीचा आरोप केला गेला.

काय झालं त्या चार वर्षात?
त्या मालिकेनंतर सौरव गांगुलीने १९९६ सालात कसोटी पदार्पण केले. एकदिवसीय पदार्पण ते कसोटी पदार्पण या चार वर्षाच्या काळात या खेळाडूला फक्त दोन एकदिवसीय सामने खेळता आले. त्यात गांगुलीने २४.५ च्या सरासरीने ४९ धावा केल्या.

याच काळात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताकडून ९३ सामन्यात ४२.४५ च्या सरासरीने ३४३९ धावा केल्या. त्यावेळी सर्वात जास्त मीडियामध्ये चर्चेत असणारा भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने ९३ सामन्यातच ३९.०५ च्या सरासरीने २८१२ धावा केल्या. श्रीनाथ आणि कुंबळे यांनी अनुक्रमे १२५ आणि १०५ विकेट्स घेतल्या.

जर कधी ह्या काळात गांगुलीला भारताकडून क्रिकेट खेळायला मिळालं असत तर?

खास लेख-

भारताच्या आजी- माजी क्रिकेटपटूंमध्ये हे ५ खेळाडू पाळतात अंधश्रद्धा

आपल्या गोलंदाजीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवणारे ५ भारतीय क्रिकेटर्स

वनडेत एकाच वर्षात त्या खेळाडूने जिंकले होते तब्बल १२ मॅन ऑफ द मॅच

करियरमधील १०० टक्के सामने सचिनसोबत खेळलेला हा होता एकमेव क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment