भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम आहेत. त्यातील एक म्हणजे एका वर्षात वनडेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा.
सचिनने वनडे कारकिर्दीमध्ये सर्वाधिक ६२ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. त्यातील १२ वेळा तर त्याने १९९८ या एका वर्षांत सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. (In 1998 Sachin won 12 man of the match awards in the one-day internationals)
सचिनच्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १९९८ चे वर्ष अनेक अर्थांनी सर्वोत्तम ठरले होते. सचिनने १९९८ ला ३४ वनडे सामने खेळले होते. यात त्याने ६५.३१ च्या सरासरीने १८९४ धावा केल्या होत्या. तसेच त्याने त्यावर्षी वनडेत ९ शतके तसेच ७ अर्धशतके केली होती.
त्यामुळे वनडेत एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा आणि सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्याच्याच नावावर नोंदवला गेला. विशेष म्हणजे आजही त्याचा हा विश्वविक्रम कोणालाही मोडता आलेला नाही.
१९९८ लाच सचिनने शारजात वाळूच्या वादळानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली शतकी खेळी प्रसिद्ध आहे.
सचिनने १९९८ ला आंततरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३९ सामन्यात ६८.६७ च्या सरासरीने १२ शतकांसह २५४१ धावा केल्या होत्या. त्याकाळी तो एका वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५०० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. त्याच्यानंतर आत्तापर्यंत ९ क्रिकेटपटूंनी असा कारनामा केला आहे.
तसेच १९९८ ला सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ विकेट्सही घेतल्या होत्या. यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोची येथे झालेल्या वनडेत ५ विकेट्स घेण्याची कामगिरीही केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी –
मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण
शुज नसण्याची गोष्ट खोटी, या कारणामुळे भारताने फिफा विश्वचषकात खेळण्याची संधी गमावली होती!
करियरमधील १०० टक्के सामने सचिनसोबत खेळलेला हा होता एकमेव क्रिकेटपटू