जेव्हाही जगातील सार्वकालीन दिग्गज खेळाडूंची नावे पुढे येतात त्यात मोहम्मद अली, मायकल जॉर्डन, मायकल शूमाकर, रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, मायकल फेल्प्स यांच्या नावाबरोबर दोन नावे कायम असतात. ती अर्थात दिग्गज क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन आणि दिग्गज धावपटू उसेन बोल्ट.
परंतु या दोन खेळाडूंच्या कारकिर्दीचा शेवट हा ऑगस्ट महिन्यात झाला आणि तोही अतिशय दुर्दैवी असाच म्हणावा लागेल.
१४ ऑगस्ट १९४८:
या दिवशी सर डॉन ब्रॅडमन हे शेवटचा कसोटी सामना खेळले. तब्बल २० वर्ष , १९७ तास मैदानावर घालवलेल्या ब्रॅडमन यांना शेवटच्या सामन्यात आपली सरासरी १०० करण्यासाठी केवळ ४ धावांची गरज होती. परंतु ते तेव्हा ० धावांवर बाद झाले. ८० कसोटी डावात तब्बल १० वेळा नाबाद राहणारे ब्रॅडमन यांनी कसोटीमध्ये एकूण ६९९६ धावा केल्या. जर तो आकडा ७००० झाला असता तर ब्रॅडमन यांनी नक्कीच १०० ची सरासरी गाठली असती.
एकप्रकारे खेळाडू म्हणून १००% परिपूर्ण अशी त्यांची गणना झाली असती. परंतु दुर्दैवाने ते ० धावेवर बाद झाले.
१३ ऑगस्ट २०१७:
ऍथलेटिक्स मधील आजपर्यंतचा सर्वात दिग्गज खेळाडू उसेन बोल्ट. जेव्हा केव्हा मैदानात उतरलाय तेव्हा सुवर्णपदाच्या खाली कोणते पदक घेतले नाही. परंतु ऑगस्ट २०१७मध्ये मात्र या खेळाडूची कारकीर्दही मनाला एक चटका लावून जाणारी ठरली.
पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान मानव १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये विश्वविक्रम आपल्या नावे असणारा, सलग तीन ऑलिंपिकमध्ये १००,२००आणि १००X४ रिले मध्ये सुवर्ण जिंकून इतिहास घडवणारा उसेन बोल्ट याच्या कारकिर्दीचा शेवट खूप निराशाजनक झाला. आपल्या सुवर्णमयी कारकिर्दीतील अंतीम शर्यत धावताना स्नायूंच्या दुखापतीमुळे तो पूर्ण देखील करू शकला नाही.