कसोटी क्रिकेटनंतर आलेल्या वनडे क्रिकेटनेही प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले. बऱ्याच संघांनी वनडे क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व मिळविले आहे. अनेक नवीन देशांतील संघ आणि त्यांच्या खेळाडूंनीही वनडे क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ह्या वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धा आहेत.
वनडेमध्ये गोलंदाजांचीही मोठी परीक्षा असते. त्यात टी-२० क्रिकेट आल्यानंतर फलंदाजांनी वनडे क्रिकेटमध्येही फलंदाजीचा वेग वाढवून गोलंदाजांचे काम अवघड केले आहे. परंतु, गोलंदाजीचा अचूक मारा आणि वेगवान गोलंदाजीमुळे वनडे क्रिकेटमधील अनेक गोलंदाजांनी फलंदाजांसाठी अडचणी निर्माण केल्या आहेत.
या लेखात अशा तीन गोलंदाजांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १०० बळी घेण्याचा विक्रम केला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये जलद १०० बळी घेणारे ३ गोलंदाज-
३. सकलेन मुश्ताक (Saqlain Mushtaq)
पाकिस्तानच्या या फिरकी गोलंदाजाने १९९७ मध्ये ग्वाल्हेर येथे श्रीलंकेविरूद्ध आपल्या १०० वनडे बळींचा टप्पा पूर्ण केला. मुश्ताकने ५३ वनडे सामन्यात १०० बळी मिळवले. वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यावर दीड वर्षानंतर सकलेन मुश्ताकने हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
सकलेन मुश्ताकने आपल्या कारकिर्दीतील एकूण १६९ वनडे सामन्यात २८८ बळी घेतले. सकलेन मुश्ताकच्या गोलंदाजीत विविधता होती. त्याची गोलंदाजी समजने फलंदाजाला कठीण जायचे. सकलेन मुश्ताकला जागतिक क्रिकेटमधील एक उत्कृष्ट ऑफ स्पिनर गोलंदाज मानले जायचे.
२. मिशेल स्टार्क (Michelle Stark)
जलद १०० वनडे विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचे नावदेखील आहे. मिशेल स्टार्कने २०१६ मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध आपले १०० वनडे बळी पूर्ण केली. मिशेल स्टार्कने ५२ वनडे सामने खेळल्यानंतर हा पराक्रम केला होता.
मिशेल स्टार्क हा सध्या ऑस्ट्रेलियन संघातील महत्त्वाच्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आत्तापर्यंत ९१ वनडे सामने खेळले असून १७८ बळी घेतल्या आहेत. यामध्ये त्याने ७ वेळा ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
१. रशीद खान (Rashid Khan)
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे नाव जागतिक क्रिकेटमध्ये फार मोठे नाही परंतु रशीद खानने आपले नाव मोठे केले आहे. रशीद खानने वनडे क्रिकेटमधील सर्वात वेगवान १०० बळी पूर्ण केले आहेत. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी रशीद खानने केवळ ४४ वनडे सामने खेळले, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. २०१८ मध्ये हरारे येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने आपले १०० बळी पूर्ण केले.
त्याने आत्तापर्यंत ७० वनडे सामने खेळले असून १३३ बळी घेतल्या आहेत. यामध्ये त्याने ४ वेळा ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: यंदा हे ५ गोलंदाज तोडू शकतात शोएब अख्तरच्या सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये येत्या काळात ६०० विकेट्सचा टप्पा गाठू शकतील असे ३ गोलंदाज
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल टीमला आलं टेन्शन, या कारणाने ऑस्ट्रेलिया इंग्लंडचे खेळाडू नाही खेळणार पहिल्या आठवड्यात
आयपीएलचे प्रायोजक होण्यासाठी आणखी दोन कंपन्यांनी दाखवला इंटरेस्ट
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूची पत्नी आहे मेकअप आर्टिस्ट