इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघ अनोख्या विक्रमांची नोंद करतो. एकदाही आयपीएल ट्रॉफी न पटकावता सर्वाधिकवेळा अंतिम सामन्यापर्यंत मजल मारण्याचा विक्रम आरसीबीने केला आहे. आतापर्यंत २००९, २०११ आणि २०१६ या तीन हंगामात आरसीबी अंतिम सामन्यात पोहोचला आहे, पण त्यांना विजय मिळवण्यात मात्र यश आले नाही.
फलंदाजीमध्ये विराटचा संघ नेहमीच दमदार राहिला आहे. पण, गोलंदाजीमध्ये मात्र संघाला तोंडघशी पडावे लागले आहे. आरसीबीच्या फलंदाजीची धुरा विराट आणि एबी डिविलियर्सने चोखपणे सांभाळली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आणि डिविलियर्सचे नाव टॉप-१० फलंदाजांमध्ये येते. त्यांच्याव्यतिरिक्त संघात अनेक दमदार फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी प्रदर्शन केले आहे.
या लेखात, आयपीएलमध्ये आरसीबीच्या फलंदाजांनी मारलेल्या सर्वात जलद अर्धशतकांविषयी आपण पाहणार आहोत.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फलंदाजांनी मारलेले ३ सर्वात जलद अर्धशतक (3 Fastest IPL Half Centuries By Royal Challengers Bangalore) –
एबी डिविलियर्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा दमदार फलंदाज एबी डिविलियर्सने आयपीएलमध्ये केवळ २१ चेंडूत अर्धशतक मारले आहे. याव्यतिरिक्त २०१२मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने त्याने नाबाद ५९ धावा केल्या होत्या.
डिविलियर्सने २०११ पासून ते २०१९ पर्यंत आरसीबीकडून १२६ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके मारत ३७२४ धावा केल्या आहेत. नेहमी आपल्या बॅटने मोठमोठे शॉट्स मारणारा डिविलियर्स आयपीएल २०२० मध्येही दमदार फलंदाजी करेल, अशी संघाला अपेक्षा असणार आहे.
रॉबिन उथप्पा
२०१० साली किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध रॉबिन उथप्पाने अर्धशतक लगावले होते. ते आरसीबी संघातील कोणत्याही फलंदाजाने केलेले सर्वात जलद अर्धशतक होते. उथप्पाने एकूण २१ चेंडूंचा सामना करत ५१ धावांची धमाकेदार खेळी केली होती.
उथप्पाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आरसीबीकडून ३१ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ३१ सामने खेळत ४ अर्धशतके करत ५४९ धावा केल्या आहेत.
ख्रिस गेल
आरसीबी संघाकडून सर्वात कमी चेंडूत अर्धशतक करण्याचा पराक्रम ख्रिस गेलने केला आहे. त्याने २०१३मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना केवळ १७ चेंडूत तूफानी अर्धशतकी खेळी केली होती. त्या सामन्यात गेलने ३० चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते आणि सामन्याच्या शेवटी त्याने नाबाद १७५ धावा केल्या होत्या.
गेलने आतापर्यंत आरसीबीकडून ८५ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ५ शतके आणि १९ अर्धशतके ठोकत ३१६३ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
-असे ५ प्रसंग जेव्हा खेळाडूंच्या अति आत्मविश्वासामुळे झाले संघाचे नुकसान
-४ सज्जन भारतीय क्रिकेटर, ज्यांनी कधीही केले नाही दारुचे सेवन
-आज जागतिक वडापाव दिन, त्यानिमित्ताने पहा कोणत्या खेळाडूला काय आवडते?
महत्त्वाच्या बातम्या –
-बीसीसीआय ‘हंड्रेड टूर्नामेंट’ आयोजित करण्यास उत्सुक, इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा दावा