आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वप्रथम कसोटी क्रिकेट आले आणि त्याला सर्वात कठीण प्रकार देखील समजले जाते. भारतीय संघाला स्वातंत्र मिळण्यापूर्वी कसोटीचा दर्जा मिळाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांचे जागतिक क्रिकेटमध्ये आदराने नाव घेतले जाते. भारतीय संघाकडूनही कसोटी क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज फलंदाज आणि गोलंदाज खेळले.
कसोटीमध्ये बऱ्याचदा खेळाडूंना संघाच्या रणनीतीनुसार खेळावे लागते. त्यात फलंदाज ग्राउंड शॉट्स किंवा तांत्रिक पद्धतीने खेळणे पसंद करतात. अनेकदा कसोटीमध्ये खेळाडूंना परिस्थिती पाहून फलंदाजी करावी लागते, त्यामुळे काहीवेळेस फलंदाजीदरम्यान विकेट्स वाचविण्याबरोबरच सामना वाचवण्यासाठी फलंदाजांना अत्यंत हळू डाव खेळावे लागतात.
या लेखात कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतच्या ५ सर्वात धीम्या डावांचा आढावा घेतला आहे.
कसोटी क्रिकेटमधील आत्तापर्यंतचे ५ धीमे डाव-
राहुल द्रविड (Rahul Dravid)
भारतीय कसोटी क्रिकेटची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध ९६ चेंडूमध्ये फक्त १२ धावा केल्या होत्या. यावेळी राहुल द्रविडचा स्ट्राइक रेट १२ पेक्षा थोडा जास्त होता. तो कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्या सामन्यात राहुल द्रविडने मैदानावर उभे राहून स्वत: ला तो खरोखर भारतीय संघाची भिंत असल्याचे सिद्ध केले होते.
एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers)
२०१५ मध्ये दिल्ली येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामना खेळाला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव वाचविण्यासाठी एबी डिव्हिलियर्सने २४४ चेंडूत केवळ २५ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला हाशिम अमला त्याच्यासोबत मैदानात होता. डिव्हिलियर्सच्या या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १० होता. दक्षिण आफ्रिकेचा पराभव वाचवण्यासाठी नेहमी स्पोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्या एबी डिव्हिलियर्सने यावेळी मात्र अत्यंत धीम्यागतीने फलंदाजी केली होती.
हनीफ मोहम्मद (Hanif Mohammad)
१९५४ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर पाकिस्तानच्या हनीफ मोहम्मदने इंग्लंडविरुद्ध २२३ चेंडूंचा सामना करत केवळ २० धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट ९ होता. त्याच्या फलंदाजीमुळे पाकिस्तानला सामना अनिर्णित राखण्यात यश आले.
यशपाल शर्मा (Yashpal Sharma)
१९८१ मध्ये या भारतीय खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ च्या स्ट्राइक रेटसह १५७ चेंडूत फक्त १३ धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघाला ३३१ धावांचा पाठलाग करायचा होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना यशपाल शर्माने सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेतला. सरतेशेवटी त्याला यशही मिळाले आणि सामना अनिर्णित राहिला.
जेफ अॅलोट (Jeff Allot)
१९९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध न्यूझीलंडच्या जेफ अॅलोटने ७६ चेंडूंचा सामना केला, परंतु त्याने एकही धाव केली नाही. परिणामी त्याचा स्ट्राइक रेटही शून्य होता. न्यूझीलंडला फॉलोऑन वाचवण्याचा प्रयत्न करताना अॅलोटने अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हा डाव खेळला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा दीर्घकाळ सामना केला आणि शेवटी जॅक कॅलिसने त्याला बाद केले.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमधील ५ धाकड फलंदाज, ज्यांनी एक नव्हे तर २ वेगवेगळ्या संघांकडून ठोकली आहेत शतकं
आयपीएलमधील धुव्वांदार फलंदाज व त्यांची आवडती मैदान जिथं ते गोलंदाजांना देत नाहीत सुट्टी
फलंदाजांना रडकुंडीला आणणारे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ५ सर्वात यशस्वी गोलंदाज
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! यावर्षी नाही होणार आयपीएल लिलाव, ही आहेत कारणे
मुलगा स्टुअर्ट ब्रॉडने केली मोठी चूक, वडील ख्रिस ब्रॉडने सुनावली ‘बाप’ शिक्षा
१९९९मध्ये केले आंतरराष्ट्रीय पदार्पण, आजही ‘ते’ तिघे खेळताय देशासाठी क्रिकेट