---Advertisement---

फक्त या खेळाडूमुळे, नाहीतर पाकिस्तान जिंकला असता एकूण ४ विश्वचषक

On: गुरूवार, जुलै 30, 2020 2:56 PM
---Advertisement---

मुंबई । पाकिस्तानमध्ये अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. पण मैदानाबाहेर काही अशी विधाने करतात ज्यामुळे खळबळ उडून जाते. पाकिस्तानचे माजी कर्णधार आमेर सोहेलनेही असे विधान केले होते, ज्यात त्यांनी वसीम अक्रम सारख्या महान खेळाडूवर खूप गंभीर आरोप केले होते. वसीम अक्रममुळे 1992 नंतर पाकिस्तानचा संघ कोणताही विश्वचषक जिंकू शकला नाही, असे अत्यंत वादग्रस्त विधानात आमिर सोहेल यांनी केले होते.

तो म्हणाला, ”1992 विश्वचषक बाजूला ठेवा आणि 1996 च्या विश्वचषक विषयी बोलायचे झाले तर 1995 मध्ये रमीज राजा कर्णधार होता आणि त्यापूर्वी सलीम मलिक कर्णधार होता. तो खूप यशस्वी झाला आणि जर तो थोडा काळ कर्णधार झाला असता तर वसीम अक्रमला कर्णधारपद मिळालं नसतं.”

सोहेल पुढे म्हणाला, ”2003 चा विश्वकरंडक पाहता वसीम अक्रमला कर्णधार बनवण्यासाठी तेच वातावरण तयार केले होते. पाकिस्तान क्रिकेटमध्ये वसीम अकरम यांचे योगदान असे आहे की, 1992 विश्वचषकानंतर पाकिस्तानला कोणताही विश्वचषक जिंकता आला नाही. अक्रम पाकिस्तानसाठी गंभीर असता तर पाकिस्तानने 1996, 1999 आणि 2003 विश्वचषक जिंकला असता.”

आमिर सोहेलच नव्हे तर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सरफराज नवाज यांनीही माजी कर्णधार वसीम अक्रमवर गंभीर आरोप केले आहेत. वसीम अक्रमच्या नेतृत्वात खेळलेले पाकिस्तानचे 1999 विश्वचषकातील दोन सामने निश्चित केले होते असा दावा सरफराज नवाज यांनी केला. 1999च्या विश्वचषकातील अंतिम सामना आणि त्याच स्पर्धेत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना निश्चित झाल्याचा दावा सरफराज यांनी केला.

पाकिस्तानने 1999 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध सामना गमावला होता. हा सामना 62 धावांच्या मोठ्या फरकाने पाकिस्तानने गमावला. या सामन्यात बांगलादेश संघाने 50 षटकांत केवळ 223 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 161 धावांवर बाद झाला. त्याचवेळी लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा संघ केवळ 132 धावा करू शकला आणि ऑस्ट्रेलियाने केवळ 20.1 षटकांत विजयी लक्ष्य गाठून विश्वचषक जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---