मुंबई । ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर आणि इंग्लिश काउंटी वूस्टरशरचा अष्टपैलू खेळाडू अॅलेक्स हेपबर्न याला मोठा झटका बसला आहे. हेपबर्न एप्रिल 2019 मध्ये बलात्काराच्या आरोपांमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर त्याने वूस्टरशर क्राउन कोर्टामध्ये निर्णयाच्या विरोधात अपील केले होते.
वूस्टरशर क्राउन कोर्टाने हेपबर्नची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे आता त्याला पाच वर्षे जेलमध्ये रहावे लागणार आहे. 24 वर्षीय अॅलेक्स हेपबर्न एका महिलेवर ती झोपेत असतानाच बलात्कार केला होता. त्याने हे वाईट कृत्य 1 एप्रिल 2017 रोजी केले होते.
हेपबर्नने त्याचा सहकारी क्लार्क यांच्या मैत्रिणीसोबत हे वाईट कृत्य केले होते. पीडित मुलीगी झोपेत असताना हेपबर्न तीच्यावर अत्याचार केल्याची तक्रार केली होती. पीडित मुलीला वाटले की, तिच्यासोबत असलेला मुलगा हा तिचा बॉयफ्रेंड आहे पण काही वेळानंतर तिला कळाले की तो आपला बॉयफ्रेंड क्लार्क नसून हेपबर्न असल्याचे तिच्या लक्षात आले.
ऑस्ट्रेलियात जन्मलेला हा अष्टपैलू खेळाडू 2013 साली क्रिकेटमध्ये करिअर बनवण्यासाठी इंग्लंडला आला होता. वयाच्या 23 वर्षी त्यांची कारकीर्द बरबाद झाली. सध्या त्याचे वय २४ वर्ष व १९३ दिवस असून त्याने केवळ २ अ दर्जाचे तर ५ टी२० देशांतर्गत सामने खेळले आहेत. २०१७मध्ये तो शेवटचा सामना खेळला आहे.