ऑस्ट्रेलियाने १९९९-२००९ या कालावधीत जागतिक क्रिकेटवर अक्षरशा राज्य केले. सलग तीन विश्वचषक, अनेक वर्ष कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान व दोन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत आपला एकछत्री अंमल क्रिकेटवर ठेवला एकाहून एक सरस फलंदाज व तितक्याच तोलामोलाचे गोलंदाज असल्याने विरोधी संघांना ऑस्ट्रेलियाला हरवणे म्हणजे डोंगर फोडण्यासारखे काम होते.
स्टीव्ह वॉ, रिकी पॉंटिंग, मॅथ्यू हेडन, ॲडम गिलख्रिस्ट, अँड्रू सायमंड्स यासारख्या फलंदाजांच्या दिमतीला ग्लेन मॅग्रा, ब्रेट ली, जेसन गिलेस्पी हे वेगवान गोलंदाज व शेन वॉर्न सारखा दिग्गज फिरकीपटू संघात होता. त्या दशकाच्या मध्यात संघात सामील झालेले मायकल क्लार्क व शेन वॉटसनसारख्या ताज्या दमाच्या खेळाडूंनी देखील संघाच्या विश्वविजयी कामगिरीत मोलाचे योगदान दिले. या सर्वांसोबत एक खेळाडू आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकत होता तरीही या इतर दिग्गजांसारखी त्याला संधी मिळाली ना प्रसिद्धी. तो खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज व आक्रमक फलंदाज अँडी बिकेल. आज बिकेलचा जन्मदिवस.
क्वींसलॅण्डसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करतात बिकेलने राष्ट्रीय संघात जागा मिळवली. १९९७ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने कसोटी व एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. मॅग्रा व गिलेस्पीसोबत तो संघाच्या वेगवान गोलंदाजी धुरा सांभाळत. बिकेल अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याच्या गोलंदाजीत मर्यादा होत्या मात्र तो सातव्या आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन वेगाने धावा काढत असत. १९९९ मध्ये ब्रेट लीचे ऑस्ट्रेलियन संघात आगमन झाल्यावर बिकेलचे स्थान डळमळू लागले. कारण, ली सातत्याने १४० च्या वेगाने गोलंदाजी करत. बिकेलने आपल्या फलंदाजीच्या क्षमतेमुळे संघातील आपली जागा टिकवून ठेवली पण तो अंतिम ११ मध्ये क्वचितच दिसत.
२००३ विश्वचषकाआधी, ऑस्ट्रेलियन संघाला काही जबर धक्के बसले होते. प्रतिभावान युवा शेन वॉटसन स्पर्धेपूर्वी दुखापतग्रस्त झाला तर डॅरेन लेहमन व फिनिशर मायकल बेवन हे सुरुवातीचे सामने उपलब्ध नव्हते. बिकेलची विश्वचषक संघात निवड झाली. मॅग्रा, ली व गिलेस्पी यांचा पर्यायी गोलंदाज म्हणून त्याला निवडले गेले होते. पण, संधी मिळाल्यावर त्याने गिलेस्पीची जागा आपल्या नावे केली. इंग्लंड विरुद्ध अवघ्या २० धावांत ७ गडी त्याने टिपले होते. संपूर्ण स्पर्धा गाजवत १२.३१ च्या अफलातून सरासरीने १६ बळी त्याने आपल्या नावे केले.
#OnThisDay in the @cricketworldcup 2003, Andy Bichel ran through England with remarkable figures of 7/20. 💥☝️
They remain the second-best figures of all time at #CWC! pic.twitter.com/WgTNJZcLC6
— ICC (@ICC) March 2, 2019
जगभरातील गोलंदाजांना घाम फोडणारा ब्रायन लारा मात्र, बिकेलचा बकरा बनत. बिकेलने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या १५ सामन्यात ७ वेळा लाराची शिकार केली होती. २००४ मध्ये शेवटची कसोटी मालिका खेळल्यानंतर, बिकेल पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून खेळेल असे कोणाला वाटत नव्हते. त्याला बोर्डाकडून करारही देण्यात आला नव्हता. तरीही, त्याने घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी सुरू ठेवली आणि पुनरागमनासाठी प्रयत्न करत राहिला. त्याचे काही चाहते “बिकेलला परत बोलवा” असे बॅनर घेऊन मैदानावर येत असत.
ऑस्ट्रेलियाकडून चांगली कामगिरी करूनही ब्रेट ली, ग्लेन मॅग्रा आणि जेसन गिलेस्पी यासारख्या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे, बिकेलला दीर्घकाळासाठी संघाबाहेर बाहेर ठेवण्यात आले. बिकेल तब्बल १९ कसोटी सामन्यांमध्ये बारावा खेळाडू होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ याने आपल्या पुस्तकात म्हटले आहे की,
“अँडी हा एक टीममॅन होता. आपल्याला संघातून का वगळले ? असा प्रश्न इतर खेळाडूंसारखा त्याने कधीच केला नाही. संघाची गरज आणि संघाचा विजय त्याला कायम महत्त्वाचा होता.”
२००४ नंतर ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमनाची त्याने सहा वर्षे वाट पाहिली. पण, त्याची निवड होऊ शकली नाही. त्याची निवड न होण्यामागे इतर खेळाडूंचे प्रदर्शन तसेच त्याची दुखापत ही कारणे होती. अखेरीस, जानेवारी २००९ मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर बिकेल २०१० आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बनला. त्यावर्षी चेन्नईने विजेतेपद देखील पटकावले. बिकेलने पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारीदेखील सांभाळली.
ट्रेंडिंग लेख –
कट्टर विरोधक चेन्नईच्या गटात सामील झालेले मुंबई इंडियन्सचे एकेवेळचे ३ धुरंदर
कसोटी डावात ५० चौकारांचा पाऊस पाडणारा जगातील एकमेव अवलिया, आजही आहे विक्रम अबाधित