गुरुवारी आयपीएलच्या सहाव्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा 97 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 206 धावा केल्या. यानंतर आरसीबी संघ केवळ 109 धावाच करू शकला.
पंजाबचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली तर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर अत्यंत खराब कामगिरी केली.
विराट कोहली विरुद्ध पंजाबचा प्रशिक्षक अनिल कुंबळे असे या सामन्याचे चित्र रंगविण्यात आले होते. या लेखात आम्ही तुम्हाला यामागील काही खास कारण सांगणार आहोत.
अनिल कुंबळे यांनी जून 2016 मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने चांगले यश मिळविले होते. त्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये कुंबळे-कोहली जोडी भविष्यात पुन्हा यशस्वी होईल अशी प्रत्येक क्रिकेटप्रेमीला आशा होती.
परंतु काही दिवसातच कुंबळे आणि विराटमध्ये वाद झाला. त्यानंतर अनिल कुंबळे यांनी 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अचानक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कुंबळेंनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यावेळी माध्यमातील काही वृत्तानुसार विराट कोहली कुंबळेंबरोबर काम करण्यासाठी इच्छुक नव्हता.
विराट कोहलीला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून कोणीतरी इतर व्यक्ती हवा होता. महान क्रिकेटपटू अनिल कुंबळेबद्दल विराट कोहलीची ही भूमिका सर्वांना माहित झाली होती. तेव्हा या वादाला विराटच जबाबदार आहे असे सर्व क्रिकेटप्रेमींना वाटत होते.
भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर अनिल कुंबळेंनी याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नाही, पण शेवटी तीन वर्षांनंतर विराट कोहलीला धडा शिकवण्याची संधी त्यांना मिळाली आणि आयपीएलमध्ये विराट कोहलीला असा काही धडा शिकविला की कदाचित विराट कोहलीला याची कायमच आठवण राहील.
प्रशिक्षक म्हणून आपली मजबूत रणनीती कशी अमलात आणता येईल हे अनिल कुंबळेंनी गुरुवारच्या सामन्यात विराटला दाखवून दिले व तो क्रिकेटमध्येही अजूनही ज्युनीयरच असल्याचे सिद्ध केले.