---Advertisement---

तिसऱ्या कसोटीत भारताचे वाढणार टेन्शन? ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाचे होणार पुनरागमन

On: सोमवार, डिसेंबर 9, 2024 7:44 PM
---Advertisement---

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. दरम्यान दोन्ही संघात 1-1 अशी बरोबरी झाली आहे. आता तिसरा कसोटी सामना (14 ते 18 डिसेंबर) दरम्यान गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला (Josh Hazlewood) दुखापत झाली होती, त्यामुळे तो दुसरा सामना खेळू शकला नव्हता. आता 24 तासात समजेल की, तो तिसरा कसोटी सामना खेळू शकणार की नाही?

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने (Josh Hazlewood) दुखापतीतून सावरण्यासाठी ॲडलेड ओव्हलवर मेहनत घेतली आहे. साइड स्ट्रेनने त्रस्त असलेल्या हेझलवूडने मंगळवारी त्याच्या फिटनेसचे मूल्यांकन करण्यासाठी सामन्यासारख्या परिस्थितीत 2 लांब स्पेल टाकले. मात्र, तिसऱ्या कसोटीतील त्याचा सहभाग येत्या 24 तासात ठरवला जाईल, असे त्याने स्पष्ट केले. जोश हेझलवूड (Josh Hazlewood) म्हणाला, “मला दुसऱ्या दिवशी माझ्या शरीराच्या प्रतिक्रियेची वाट पाहावी लागेल. जर मला पूर्णपणे बरे वाटले, तरच मी खेळण्याचा निर्णय घेईन.”

जोश हेझलवूड गेल्या काही वर्षांपासून साइड स्ट्रेनशी झुंजत आहे, ज्यामुळे तो 2021-22 ॲशेस मालिकेतील बहुतांश सामने आणि 2023 मधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात खेळू शकला नाही. त्याने सांगितले की, ही समस्या त्याच्या शरीरशास्त्राशी देखील संबंधित आहे, ज्यामध्ये फासळी आणि नितंबाच्या हाडांमध्ये कमी अंतर आहे, ज्यामुळे स्नायूंवर अतिरिक्त दबाव पडतो.

जोश हेझलवूड म्हणाला, “जर ॲडलेड कसोटी हा उन्हाळ्यातील शेवटचा सामना असता, तर मी खेळण्याची जोखीम पत्करू शकलो असतो. पण याचा अर्थ मला नंतर दीर्घ विश्रांती घ्यावी लागली असती. मला आता माझी दुखापत आणि रिकव्हरीबाबत चांगला अनुभव आहे.”

बॉर्डर गावस्कर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी

महत्त्वाच्या बातम्या-

दोन भाऊ इंग्लंडसाठी खेळतात, तिसऱ्या भावानं देश बदलला! या संघाकडून पदार्पण करणार
कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक झेल घेणारे टाॅप-5 खेळाडू
मोहम्मद सिराजला मोठा झटका, आयसीसीने केली कारवाई; ट्रॅव्हिस हेडची सुटका!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---