मुंबई । पाकिस्तानचे खेळाडू कोणत्याही स्पर्धेत किंवा मालिकेत खेळत असतात आणि त्यात वाद होणार नाही, असे खूप कमी वेळा घडते. वेस्ट इंडिजच्या कॅरेबियन प्रीमियर लीग 2020 मध्येही वाद झाला आहे. यामुळे जमैका तहलावाझकडून खेळणारा पाकिस्तानी फलंदाज असिफ अली मोठ्या अडचणीत सापडला आहे.
आसिफ अलीने मंगळवारी गयाना ऍमेझॉन वॉरियर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अष्टपैलू किमो पॉलला बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. ह्या पाकिस्तानी फलंदाजाला बाद केल्यानंतर किमो पॉलने जल्लोष साजरा केला. त्यानंतर आसिफ अलीने पॅव्हेलियनमध्ये परतत असताना किमो पॉलच्या तोंडावरुन बॅट फिरवली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
ही घटना जमैका तल्लावाह संघाच्या डावाच्या 8 व्या षटकातील आहे. जेव्हा जमैका संघाकडून खेळणाऱ्या आसिफ अलीने कीमो पॉलचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण बॉलचा त्याच्या बॅटशी चांगला संपर्क झाला नाही आणि लाँग ऑनवर उभा असलेला गयानाचा कर्णधार ख्रिस ग्रीनने हवेत सूर मारत शानदार झेल टिपला. त्यानंतर पॉलने आनंद साजरा केला. यानंतर अचानक आसिफ अली चिडला आणि पॉलच्या तोंडाजवळ बॅट फिरवली. पॉल बॅटपासून काही सेंटीमीटर अंतरावर होता. अन्यथा त्याच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असती.
Pakistan Batsman Asif Ali Attempts To Hit Keemo Paul With Bat😲 #CPL20pic.twitter.com/9zikgFKC6F
— Hibernator (@TheMSDhon7) August 27, 2020
आसिफ अलीची हे कृत्य पाहून समालोचकांनाही आश्चर्य वाटले. त्यानंतर पॉलही चिडला आणि त्याने पाकिस्तानी फलंदाजाला सुनावले. अली अवघ्या 3 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. अलीच्या या कृत्यानंतर त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
या सामन्यात गयानाच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत केवळ 108 धावा केल्या होत्या, संघातील 7 फलंदाज दुहेरी आकडाही पार करु शकले नाहीत. प्रत्युत्तरात जमैका संघाने 18 व्या षटकात 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. जमैकाचा फिरकीपटू मुजीब उर रहमान 4 षटकांत 11 धावा देऊन 3 गडी बाद केले. तो सामनावीर ठरला.
कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये, तिन्ही सामने जिंकून ट्रिनबागो नाइट रायडर्स अव्वल स्थानी आहे. सेंट लुसिया ज्यूक्सने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि दुसर्या क्रमांकावर आहेत. गयानाच्या संघाने 5 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर, 4 पैकी 2 सामने जिंकून जमैकाचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. बार्बाडोस संघ एका विजयासह पाचव्या आणि सेंट किट्स एक सामना जिंकून शेवटच्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रखवालदाराचा मुलगा झाला आयपीएलमधला टॉप क्रिकेटर, मोदीही घेतात त्याचे नाव
बाप क्रिकेटर विराट कोहली होणार बाबा, इंस्टाग्रामवरुन केली घोषणा
ट्रेंडिंग लेख –
कसोटी डावात ५० चौकारांचा पाऊस पाडणारा जगातील एकमेव अवलिया, आजही आहे विक्रम अबाधित
८ तासांत कसोटीत त्रिशतक करणारे जगातील एकमेव फलंदाज, ४६ चौकारांचा दिला गोलंदाजांना प्रसाद
मॅगी खायलाही एकवेळ तरसणारा क्रिकेटर आज आहे मुंबई इंडियनच्या टॉप प्लेअर