भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे शुक्रवारी (४ डिसेंबर) झाला. हा सामना भारतीय संघाने ११ धावांनी खिशात घातला. या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त कामगिरी केली. भारताच्या आव्हानाच्या दिशेने कूच करणाऱ्या स्टीव्ह स्मिथचा कठीण झेल संजू सॅमसनने घेतला. या दरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने गोलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीस आमंत्रित केले होते. यावेळी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्स गमावत १६१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने ७ विकेट्स गमावत १५० धावाच केल्या.
यावेळी ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का ऍरॉन फिंचच्या रूपात ५६ धावांवर बसला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ फलंदाजीला आला. स्मिथची मागील सामन्यांतील कामगिरी पाहून तो या सामन्यातही चांगली खेळी करेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यात तो अपयशी ठरला.
फिरकीपटू युझवेंद्र चहल टाकत असलेल्या १० व्या षटकातील ५ वा चेंडू स्मिथने डीप मिडविकेटच्या दिशेने फटकावला. यावेळी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेला भारतीय संघाचा खेळाडू संजू सॅमसनने धावत येत हा कठीण झेल घेतला. त्यामुळे स्मिथला १२ धावांवरच तंबूचा रस्ता धरावा लागला.
???? Some catch from Sanju Samson to remove Steve Smith!#AUSvIND pic.twitter.com/eCpZ4eUpOQ
— ICC (@ICC) December 4, 2020
https://twitter.com/realkundan/status/1334845619865710595
https://twitter.com/Kamalesh073/status/1334821740241817600
युझवेंद्र चहलने भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे चहल रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने मैदानात उतरला होता. त्याने यावेळी सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. त्याच्यासोबतच टी२०त पदार्पण करणाऱ्या टी नटराजननेही उत्कृष्ट कामगिरी करत ३ विकेट्स घेतल्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा टी२० सामना रविवारी (६ डिसेंबर) सिडनी येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे पाठोपाठ आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही टी नटराजनचे पदार्पण
Video – सात वर्षाच्या चिमुरड्या भारतीय मिस्ट्री स्पिनरची गोलंदाजी पाहून तुम्हीही व्हाल आवाक्
भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर






