मुंबई । बीसीसीआय 19 नोव्हेंबरच्या संभाव्य तारखेपासून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपासून देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू करण्याची योजना आखत आहे. परंतु इंडियन प्रीमियर लीगच्या वेगवेगळ्या संघांकडून खेळणारे भारतीय खेळाडू, क्वारंटाईनशी संबंधित नियमांमुळे काही सुरुवातीच्या फेर्या खेळू शकणार नाही. कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशांतर्गत क्रिकेटला उशिरा सुरुवात झाली आहे. यंदा केवळ मुश्ताक अली करंडक आणि रणजी करंडक होणार असून या दोन्ही स्पर्धात 38 संघ 245 सामने खेळतील.
इराणी चषक स्पर्धेची कोणतीही योजना नाही
यावर्षी विजय हजारे ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी किंवा चॅलेन्जर ट्रॉफीचे आयोजन केले जाणार नाही. आतापर्यंत इराणी चषक स्पर्धेची कोणतीही योजना नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, “ही तात्पुरती यादी तयार केली गेली असून ती अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविली आहे.”
“सरकारच्या नियमांनुसार, आयपीएल खेळून परतलेल्या खेळाडूंना 14 दिवस वेगळे रहावे लागेल. हा मुद्दा मुख्यत: त्या खेळाडूंचा आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत , जे संघासमवेत आहेत आणि त्यांना काही क्रिकेट खेळायचे आहे, ” असे त्या अधिकार्याने सांगितले. प्ले-ऑफपूर्वी प्लेअरचा संघ बाहेर पडला असला तरी 3 नोव्हेंबरपूर्वी ते परत येऊ शकणार नाहीत आणि 17 नोव्हेंबरपर्यंत क्वारंटाइनमध्येच रहावे लागेल.
तीन आठवड्यांचा ब्रेक आवश्यक आहे
ते म्हणाले की “ज्या संघांनी प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे आणि अंतिम फेरी गाठू शकेल अशा संघांना पहिल्या काही फेर्यांपासून दूर रहावे लागेल, परंतु हा मसुदा प्रस्ताव असून यात बदलू होऊ शकतो.” बीसीसीआयने पुढील आयपीएल मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीपासून भारतात आयोजित करणे अपेक्षित आहे. रणजी फायनल आणि आयपीएलची सुरुवात यांच्यात तीन आठवड्यांचा ब्रेक आवश्यक आहे, जेणेकरुन खेळाडूंना आलेला थकवा दूर करता येईल.