इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम सुरु होण्यासाठी आता केवळ एक आठवडा उरला आहे. १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२०चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. अशात टूर्नामेंटची सुरुवात होण्यापुर्वीच माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट लीने यावर्षीच्या आयपीएल विजेता संघाची भविष्यवाणी केली आहे. Bret Lee Picks The IPL Winner Of 2020
ब्रेट ली यांच्या खांद्यावर आयपीएल २०२०चे समालोचन करण्याची जबाबदारी आहे. अशात ब्रेट लीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर बोलता एका चाहत्याने त्याला या आयपीएल हंगामाचा विजेता संघ कोण असेल, हा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ब्रेट लीने आयपीएलच्या दूसऱ्या सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचे नाव घेतले.
“आताच आयपीएल २०२०च्या विजेत्या संघाची भविष्यवाणी करणे खूप अवघड आहे, पण मला वाटते की धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघ यंदा विजेता ठरू शकतो,” असे बोलताना ब्रेट ली यांनी म्हटले.
ब्रेट ली यांच्या भविष्यवाणीनुसार जर यंदा सीएसकेने आयपीएल ट्रॉफी पटकावली. तर ते ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावत रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाची बरोबरी करु शकतात. त्यामुळे हे पाहणे रोमांचक ठरेल की, ब्रेट लीची भविष्यवाणी खरी ठरेल का नाही?
सीएसके संघातील मिस्टर आयपीएल सुरेश रैना आणि दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. असे असले तरी, संघात धोनी, अंबाती रायडू, केदार जाधव, पियुष चावला, रविंद्र जडेजा असे दमदार भारतीय खेळाडू उपलब्ध आहेत. तर, शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, सॅम करन, इमरान ताहिर असे दमदार परदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे सीएसकेकडे यावर्षी आयपीएलचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सराव करताना धोनीने मारलेला षटकार पाहून मुरली विजय झाला दंग; बोलती झाली बंद
सीएसके संघात रैनाच्या जागी ‘हा’ असेल आदर्श खेळाडू; दिग्गजाने दिला पर्याय
१५-२० नाही तर तब्बल ४५ खेळाडूंसह न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार हा संघ
ट्रेंडिंग लेख –
आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी कार्तिक निवडेल ‘या’ ११ शिलेदारांना
या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?
अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट






