ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांच्या एका हरकतमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्यावर नाराज झाले आहे. आगामी भारत – ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये वर्णभेदाविरोधात संदेश देण्यात येणार आहे. तेव्हा हा संदेश देण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने पूर्व रुल्स फुटबॉलपटू एडम गुड्सकडून सल्ला घ्यावा असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना लॅंगर यांनी केले आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड नाराज आहे.
जस्टिन लॅंगर यांनी ऑस्ट्रेलियन पत्रकार स्टान ग्रांटचे देखील नाव घेतले होते. ज्याने एडमने सामना केलेल्या वर्णभेदावर आधारित ‘द ऑस्ट्रेलियन ड्रीम्स’ हा चित्रपट लिहला होता.
‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ च्या बातमी नुसार एडम आणि ग्रांट या दोघांची नावे चर्चेत आल्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट लॅंगरवर नाराज आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मते या दोघांशी फक्त थोडक्यात बोलणी करायची होती आणि त्यांच्यावर इतर कसलाही दबाव अथवा जोर जबरदस्ती न करण्याचे आमची तयारी होती. पण लॅंगरने उघडपणे त्यांची नावं घेणे क्रिकेट ऑस्ट्रेलिया अंतर्गत काही लोकांना पटलेले नाही.
पत्रकार ग्रांटची पत्नी ट्रेसी होल्मस हिने देखील ग्रांटचे नाव त्याच्या परवानगीशिवाय उघडपणे घेणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. जे लँगर यांनी माध्यमांशी बोलताना घेतले होते. त्यांनी कमीतकमी एक फोन तरी करायला हवा होता. असे ट्विट ट्रेसी होल्मसने केले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी रात्री मर्यादित षटकांच्या सामन्याचा कर्णधार एॅरोन फिंच, गोलंदाज पॅट कमिन्स आणि गॅविन डोवे यांच्याबरोबर या विषयावर चर्चा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-हा तूझा शेवटचा सामना आहे का? प्रश्नावर धोनीने दिले ‘हे’ उत्तर
-क्रिकेटपटूंचे विक्रम अनेक पाहिले, आता ‘या’ अंपायरनेचे केलाय मोठा कारनामा
-जोडी नंबर वन! तब्बल ९४ वर्षांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या जोडीने मोडला ‘हा’ मोठा विक्रम
ट्रेंडिंग लेख-
-एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
-ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण