---Advertisement---

हा तूझा शेवटचा सामना आहे का? प्रश्नावर धोनीने दिले ‘हे’ उत्तर

On: रविवार, नोव्हेंबर 1, 2020 3:21 PM
---Advertisement---

रविवारी(१ नोव्हेंबर) आयपीएल २०२० मध्ये ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. या सामन्यात चेन्नईने नाणफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या नाणेफेकीवेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला त्याच्या आयपीएलमधील भविष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

त्याला डॅनी मॉरिसन यांनी प्रश्न विचारला की पंजाब विरुद्धचा हा सामना आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे का? त्यावर धोनीने सांगितले की ‘नक्कीच नाही. हा सामना चेन्नई संघासाठी शेवटचा सामना नाही.’

धोनीने हा त्याचा शेवटचा सामना नाही, हे सांगून एकूणच त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीच्या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम लावला आहे.

धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीची होत होती चर्चा

धोनी मागील काही चेन्नईच्या सामन्यांनंतर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना जर्सी भेट देत होता. तसेच जर्सीवर स्वाक्षरीही देत होता. यावरुन अनेकांनी आयपीएल २०२० चा हंगाम त्याच्या कारकिर्दीत शेवटचा हंगाम असू शकतो, असा कयास लावला होता.

ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

आयपीएल २०२० सुरु होण्याआधी धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत तो निवृत्ती घेत असल्याचे त्याने सांगितले होते.

धोनीची आयपीएल कारकिर्द –

धोनीने आयपीएलमध्ये २०४ सामने खेळले असून यात त्याने ४०.९९ च्या सरासरीने ४६३२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ११२ झेल आणि ३९ यष्टीचीत केले आहेत. तो आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटपटूंचे विक्रम अनेक पाहिले, आता ‘या’ अंपायरनेचे केलाय मोठा कारनामा

जोडी नंबर वन! तब्बल ९४ वर्षांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या जोडीने मोडला ‘हा’ मोठा विक्रम

काय सांगता! इरफान करतोय कमबॅक, २२ नोव्हेंबर रोजी खेळणार पहिला सामना

ट्रेंडिंग लेख –

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण

…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---