चेन्नई सुपर किंग्स संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैना हा काही दिवसांपुर्वी वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला होता. त्यामुळे त्याच्या ठिकाणी संघात कोणत्या खेळाडूला स्थान दिले जाईल, याच्या सर्वत्र चर्चा चालू आहेत. अशात नुकतेच असे वृत्त ऐकायला मिळत होते की, रैनाच्या जागी संघात इंग्लंडचा स्टार टी२० फलंदाज डेव्हिड मलानला सामील करण्यात येईल. परंतु, सीएसकेचे सीईओ यांनी स्पष्ट केले आहे की, मलानला रैनाच्या जागी संघात स्थान देण्यात येणार नाही. CSK CEO Clarified That David Malan Will Not Included In Team
माध्यमातील वृत्तानुसार सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ म्हणाले की, “इंग्लंडचा स्टार फलंदाज मलानला आम्ही संघात स्थान देणार नाही. कारण, अगोदरच संघात परदेशी खेळाडूंची भरमार आहे. अशा परिस्थितीत आम्ही दूसऱ्या कोणत्या परदेशी खेळाडूला संघात सामील करु शकत नाही.”
आतापर्यंत आयपीएलमध्ये ३ वेळा विजेत्या ठरलेल्या सीएसकेमध्ये ड्वेन ब्रावो, सॅम करन, फाफ डू प्लेसिस, जोश हेजलवुड, इम्रान ताहिर, लुंगी एन्डिगी, मिचेल सँटनर, शेन वॉटसन हे परदेशी खेळाडू उपलब्ध आहेत. त्यामुळे विश्वनाथ यांच्या म्हणण्यानुसार मलानला सीएसकेत स्थान मिळणे जवळपास अशक्य आहे.
मलानची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील आकडेवारी पाहायची झाली तर, त्याने केवळ १६ सामने खेळत ६८२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु, त्याला अजूनही आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. जर, त्याला रैनाच्या जागी सीएसकेत संधी मिळाली असती, तर तो आयपीएलमध्ये पदार्पण करु शकला असता.
महत्त्वाच्या बातम्या –
१५-२० नाही तर तब्बल ४५ खेळाडूंसह न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार हा संघ
दुर्दैवी! फुटबॉल खेळत असताना या २ क्रिकेटपटूंचा झाला मृत्यू, जाणून घ्या कारण
मॅक्सवेल, मार्शचे शानदार अर्धशतक; ऑस्ट्रेलियाचा पहिल्या वनडेत विजय
ट्रेंडिंग लेख –
आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी कार्तिक निवडेल ‘या’ ११ शिलेदारांना
या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?
अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट